आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youth Get Rigorous Imprisonment In The Case Molest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत अल्पवयीन मुलीला शेताच्या बांधावर अडवून केला होता विनयभंग; अश्लील चाळे करणाऱ्यास 3 वर्षे सक्तमजुरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळेत शिकवणीसाठी जाणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेताच्या बांधावर अडवून विनयभंग करत तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या २३ वर्षीय गुलाब किसन गायकवाड यास विशेष न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 
२६ ऑगस्ट २०१६ रोजी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकवणीसाठी शेताच्या बांधावरून जाताना समोरून गुलाब किसन गायकवाड (२३) आला. त्याने काहीएक न बोलता अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने काट्यांवर उडी मारली. त्यानंतरही तो तिच्या पाठीमागे उडी मारून अश्लील चाळे करू लागल्यामुळे ती जोरात ओरडली. 

नातीचा आवाज ऐकून तिचे आजोबा धावत आल्याने गुलाब गायकवाडने शेताच्या बांधावरून उडी मारून पळ काढला. दरम्यान, अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी मुलीला सोबत घेऊन पिशोर पोलिस ठाणे गाठून गायकवाड विरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

 

विनयभंग करणाऱ्या गुलाब गायकवाडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. न्यायालयाने विनयभंग केला म्हणून एक वर्ष सक्तमजुरी, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार ८ कलमान्वये दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.