आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी कन्नडमध्‍ये युवकाने घेतला गळफास; शेजाऱ्यांनी तत्‍काळ धाव घेत कापली दोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्‍नड - मराठा आरक्षणासाठी कन्‍नड तालुक्‍यातील मुंदवाडी गावात रवींद्र साहेबराव जाधव (वय 25) या युवकाने गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. मात्र, शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्‍यांनी ताबडतोब घटनास्‍थळी धाव घेत त्याचा गळफास कापला व त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

 

प्रत्यक्षदर्शी रामेश्वर घानवत यांनी दिलेल्या माहिती नुसार, रवींद्रला आजच्या मराठा आंदोलनात सहभागी व्‍हायचे होते. मात्र घरच्‍यांनी त्‍याला विरोध केला होता. खूप प्रयत्न करूनही आरक्षणामुळे नोकरी मिळत नाही या नैराश्यातून त्‍याने घरातील पत्राच्या दांड्याला दोराच्या साह्याने आज फाशी लावून घेतली. छताची उंची सात फुटच होती. त्यामुळे त्याचे पाय जमिनीला टेकले व तो तडफडत असतांना भाऊ राजू जाधव व रामेश्वर घनकर धावत आले. त्यांनी ताबडतोब दोरी विळ्याने कापून त्याला दवाखान्यात हलवले. कन्नड ग्रामीण रुग्णालयाने प्रथमोपचार करून त्यांना घाटीत पाठवले. रवींद्र हा बारावी शिकलेला असून तो सध्‍या नोकरीच्या शोधात होता. औरंगाबाद आणि पुण्यात त्याने पोलिस भरतीचे प्रशिक्षणही घेतले होते. मात्र नोकरी मिळत नव्हती.


पुढचे २४ तास चिंतेचे

रवींद्रच्‍या गळ्यावर फासाचे निशाण आहेत. सिटी स्कॅन करून त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भारत सोनवणे यांनी सांगितले. गळफास घेतल्याने त्‍याच्‍या मेंदूला होणारा रक्त पुरवठा थांबला होता. त्यामुळे पुढील 24 तास चिंतेचे आहेत, असे ते म्हणाले. घाटीतील तज्ज्ञ डॉक्‍टर जैन, शल्यचिकित्सक डॉ. सुरेश हरबडे व  डॉ. आनंद बिडकर यांनी सांगितले की, रवींद्रच्‍या मानेच्या हाडांना डॅमेज झालेले नसले तरी तो अर्धा तास बेशुद्ध अवस्थेत होता. त्यामुळे तो अजूनही धोक्यात आहे. डॉ गजानन सुरवाडे, डॉ अनिल पुंगळे, डॉ विकास राठोड आदी डॉक्टरांची टीम रवींद्र वर उपचार करत आहे.

 

आमदारांनी घेतली भेट
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घाटीत रवींद्र याची भेट घेऊन डॉक्टरांना जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी उद्यापासून मराठवाड्यात समुपदेशन यात्रा काढत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...