आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका लव्ह स्टोरीचा अंत : लग्नानंतर अडिच महिन्यात तरुणाने घेतली फाशी, लिहिली 11 पानी सुसाइड नोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजनांदगांव - छत्तीसगड येथे आंतरजातीय विवाहानंतर सुमारे अडिच महिन्यांनी एका तरुणाने पत्नीच्या नातेवाईकांच्या दबावात येत रविवारी फाशी घेतली. बीएड करणाऱ्या पवन साहू (23) ने मृत्यूपूर्वी 11 पानी सुसाइड नोटमध्ये सासरे आणि चुलत सासऱ्यांनी अपमान केल्याचा आरोप केला आहे. तरुणाने पत्नी पायल जैन (23) बरोबर विवाह झाल्याचे सिद्ध करण्यासाठी सासरी मॅरेज सर्टिफिकेटची कॉपी चिटकवली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत पोहोचले. पोलिसांना त्याला एका दिवसासाठी ताब्यात घेतले या घटनेने त्याच्या मनावर परिणाम झाला आणि त्याने आत्महत्या केली. 


तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांवरही तरुणाचा छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना तरुणाला पोलिस ठाण्यात बोलावून कोऱ्या कागदावर त्याच्या सह्या घेतल्या होत्या असे नातेवाईक म्हणाले. पवन आणि पायल यांचे अफेयर कॉलेजमध्ये असताना सुरू झाले होते. त्यांनी 18 जूनला पळून जाऊन 29 जूनला भिलाईमध्ये लग्न केले होते. काही दिवसांतच पायलचे नातेवाईक तिला परत घेऊन गेले. पवन तिला भेटण्यासाठी सारखा प्रयत्न करत राहिला. पण कुटुंबीयांनी त्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे त्रस्त होऊन त्याने मॅरेज सर्टिफिकेटची कॉपी सासरी चिटकवली होती. 

 
गावकऱ्यांचा दबाव 
सुसाइड नोटबाबत कुटुंबीयांना माहिती होती. पण पोलिसांकडून काही गडबड होण्याच्या शक्यतेमुळे गावकरी जमा झाले होते. त्यांनी माध्यमांच्या उपस्थितीत मृतदेह उतरवण्याची आणि सुसाइड नोट सार्वजनिक करण्याची मागणी केली. पोलिसांनी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकली त्यानंतर 11 पानांचे सुसाइड नोट समोर आले. 

 
पत्नीच्या वडील आणि काकांवर आरोप 
पवनने सुसाइड नोटमध्ये पायलचे वडील धर्मेन्द्र जैन आणि काका देवेंद्र जैन यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. त्याने लिहिले की, पायल गर्भवती होती पण नातेवाईकांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. सुसाईड नोटमध्ये कुटुंबाकडून दबाव आणल्याचा आणि धमकावल्याचा उल्लेखही केला आहे. 


दंडाधिकाऱ्यांचा एकतर्फी निर्णय 
मुलाच्या वडिलांनी म्हटले की, माझा मुलगा आणि त्याची प्रेयसी 18 जूनला घरातून पळाले होते. 29 जूनला दोघांनी लग्न केले. त्याचदरम्यान सुमारे 15 दिवस ते बाहेर राहिले. दोघे आमच्या घरी परतले होते तेव्हाच तरुणीचे वडील तिला बळजबरी घेऊन गेले. पोलिसांत याची तक्रार केली पण त्यांच्या विरोधात काही कारवाई जआली नाही. त्यानंतर आम्ही कोर्टात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पण कोर्टात एकदाही तरुणीला जबाबासाठी बोलावले नाही. उलट दंडाधिकाऱ्यांनी दोघेही प्रौढ असूनही मुलीच्या वडिलांच्या बाजुने निर्णय दिला. दुसरीकडे तरुणीचे वडील धर्मेंद्र जैन म्हणाले की, पवनने त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी गावात पोस्टर चिटकवले होते. त्याची तक्रार मी पोलिसांत दिली होती. 


पोलिस म्हणतात तपास सुरू  
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये 11 पानांचे सुसाइड नोट जप्त करण्यात आले आहे. त्यात तरुणाने पत्नीच्या तीन नातेवाईकांवर छळाचा आरोप केला आहे. सुसाइड नोटमध्ये पोलिसांवर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई होईल. 

 

बातम्या आणखी आहेत...