आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड : कांकेरमध्ये किकी चॅलेंज पूर्ण करण्यासाठी दुथडी वाहणाऱ्या नदीत घेतली उडी, बुडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर - छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात किकी चॅलेंजने एक बळी घेतला आहे. पण हा बळी काही रस्त्यावर डान्स करताना अपघात होऊन गेलेला नाही, तर नदीत बुडून झाला आहे. किकी चॅलेंजपूर्ण करण्यासाठी या युवकाने डान्स करताना नदीत उडी मारली होती. 


प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार सय्यद अहमद (37) हे मित्रांबरोबर नदीच्या किनाऱ्यावर उभे होते. त्यावेळी मित्रांबरोबर चर्चा सुरू असताना उत्साहाच्या भरात त्यांनी मित्रांबोरबर एक पैज लावली. ही पैज होती किकी चॅलेंजप्रमाणे डान्स करत नदी पार करण्याची. ही पैज लावून सय्यदने नदीत उडी घेतली. त्यावेळी त्याचे मित्र त्याला अडवण्याऐवजी त्याचा व्हिडिओ तयार करू लागले. सय्यद काही अंतरापर्यंत पोहला पण पुढे नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला. त्यामुळे तो वेगाने पुढे जाऊ लागला. घटनेनंतर पोलिस याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी चौकशी केली. मोठ्या प्रयत्नांनंतर रात्री उशिरा सय्यदचा मृतदेह शोधण्यात मदत झाली. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे. तसचे सय्यदबरोबर असलेल्या इतरांचाही शोध घेतला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...