ज्या दिवशी झाली / ज्या दिवशी झाली वडिलांची हत्या, वर्षभरानंतर त्याच तारखेला मुलाने केला मारेकऱ्याचा शिरच्छेद; मुंडके धडावेगळे करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 02:57:00 PM IST

रायपूर - छत्तिसगडच्या जशपूर जिल्ह्यातील बरटोली परिसरात एका युवकाचा खून करून त्याचे शिर धडावेगळे करण्यात आले आहे. ज्याने खून केला त्याच्या वडिलांची पहिली पुण्यतिथी होती. तर ज्याचा खून झाला तोच आरोपीच्या वडिलांचा मारेकरी होता. अर्थातच, ज्या दिवशी वडिलांचा खून झाला होता, वर्षभरानंतर त्याने त्याच तारखेला मारेकऱ्याची हत्या केली. एवढेच नव्हे, तर तो स्वतः पोलिस स्टेशनला गेला आणि हत्येची कबुली देत आत्मसमर्पण केले.

असे आहे प्रकरण...

- बरटोली परिसरात राहणाऱ्या निशांत नायकचे (20) वडील ब्रह्मदेव नायक यांची 8 नोव्हेंबर 2017 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणात जवळपास राहणारा राहुल (20) याला अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात हत्येचा खटला चालवण्यात आला. परंतु, तीन महिन्यांपूर्वी कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

- आपल्या वडिलांचा मारेकरी मोकाट फिरत असल्याचा राग निशांतच्या मनात होता. निशांतने या दरम्यान वेळोवेळी राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरुवात केली. अनेकवेळा दोघांमध्ये वादही झाले. त्यात गुरुवारी निशांतच्या वडिलांची पहिली पुण्यतिथी होती. याच दिवशी निशांतच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या.

- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांतने याच दिवशी राहुलची हत्या करणार असे ठरवले होते. प्लॅनिंगनुसार, त्याने राहुलला अडवले आणि वाद घातला. यावेळी दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. निशांतने अचानक आपल्याकडे असलेले धारदार शस्त्र काढले आणि राहुलवर सपा-सप वार केले. एवढेच नव्हे, तर त्याचे शिर सुद्धा धडापासून वेगळे केले.

हत्या करून पोलिसांना शरण गेला निशांत

घटनास्थळी काही लहान मुले क्रिकेट खेळत होती. परंतु, अचानक झालेली ही हत्या पाहून ते प्रचंड घाबरले. त्यापैकीच एकाने राहुलचा भाऊ सूरजकडे जाऊन या घटनेची माहिती दिली. वेळीच घटनास्थळी दाखल झालेला सूरजने आपल्या भावाचा शिर नसलेला मृतदेह पाहून हंबरडा फोडला. निशांतला मारण्यासाठी तो सरसावला. परंतु, निशांतने सूरज आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून तेथून पळ काढला. त्यानंतर काही वेळात खुद्द पोलिस स्टेशनमध्ये शरण आला.

X
COMMENT