आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या प्रियकराचे चिडलेल्या भावाने केली निर्घृण हत्या, मृतदेह फेकला नाल्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‍बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने भावाने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही बहिणीच्या प्रियकराचा मृतदेह नाल्यात फेकला. ही घटना साकोली (जि.भंडारा) तालुक्यातील किही-एकोळी घडली अाहे. आरोपीने या कामात आई-वडिलांची मदत घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

 

अनिकेत बडोले (वय 22 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. अनिकेतचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. 18 जानेवारी रोजी अनिकेत मुलीसह तिच्याच घरी आक्षेपार्ह अवस्थेत सापडला होता. मुलीचा भाऊ आणि वडिलांनी त्याला बेदम मारहाण केली. टी-शर्टने गळा आवळून त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह गावाशेजारी असलेल्या नाल्यात फेकून दिला.

 

अनिकेत बेपत्ता झाल्याने त्याचा भाऊ तुषार बडोले यांनी साकोलीच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांना नाल्यात अनिकेतचा मृतदेह आढळला. मुलीचा भाऊ, आई आणि वडिलांनी अनिकेतची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

 

पोलिसांनी मुलीचे वडील रामेश्वर वालदे, आई ममता वालदे, भाऊ मेघराज वालदे यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...