Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | youth killed in biker-truck accidnet in solapur

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, मुळेगाव तांड्याजवळील घटना; अपघातात तरुण ठार

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 09:43 AM IST

दुचाकीवर सोलापूरच्या दिशाने येताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने ठोकरल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी गावात

  • youth killed in biker-truck accidnet in solapur

    सोलापूर- दुचाकीवर सोलापूरच्या दिशाने येताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने ठोकरल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी गावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी तीनच्या सुमाराला मुळेगाव तांड्याजवळ घडला. महेश नवनाथ कोरे (वय २६, रा. तांदुळवाडी) असे मृताचे नाव आहे.


    कोरे दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने येत होता. समोरून येणाऱ्या ट्रकची (केए ५६ / २९२२) जोरदार धडक बसल्यामुळे डोक्यावरून चाक गेल्यामुळे तो बेशुद्ध पडला. अपघातानंतर दुचाकी लांब पडली. कोरे यांच्या डोक्यातून माेठ्या प्रमाणात रक्त जात होते. पोलिसांनी उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मरण पावल्याचे सांगण्यात आले. हैदराबाद सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने चालू आहे. वारंवार या मार्गावर अपघात होताहेत. मागील महिनाभरातील हा दुसरा बळी आहे. कोरे हे पेट्रोल पंपावर काम करत होते. कामानिमित्त दुचाकीवर येताना हा प्रकार घडला. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद आहे.


    आणखी किती जणांचे घेणार बळी?
    सहा महिन्यांपूर्वीच तांदुळवाडी येथील जयप्रकाश कोरे यांचा बोरामणी येथे अपघाती मृत्यू झाला होता. २०१४ पासून सोलापूर-हैदराबाद मार्गाचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूने रस्ता सुरू असल्याने नेमका जाण्यासाठी कोणता व येण्यासाठी कोणता मार्ग आहे? याची कल्पना आली नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. याबाबत नागरिकांनी आंदोलने, रास्ता रोको केले. अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. पण महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार व जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.

Trending