Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | youth killed in truck accident during funeral of his uncle

काकाच्या अंत्ययात्रेस आला, रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडले

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 08:31 AM IST

काकांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत न पोहोचल्याने ते पाहण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या पुतण्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले. अ

  • youth killed in truck accident during funeral of his uncle

    सोलापूर- काकांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत न पोहोचल्याने ते पाहण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या पुतण्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले. अंबादास चिटमील (३२) असे मृताचे नाव असून त्याचा मित्र जखमी झाला आहे.

    अंबादासच्या काकाचे सोमवारी दुपारी निधन झाल्याने तो कामावरून थेट स्मशानभूमीत आला. अंत्ययात्रा आलीच नसल्याने मित्रासोबत दुचाकीवरून स्मशानभूमीतून तो बाहेर पडला. रस्ता ओलांडून जाताना ट्रकची धडक बसली आणि मागे बसलेला अंबादास गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Trending