आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीला छतावरून फेकल्यानंतर तुरुंगात शिक्षा भोगून सुटला दीर, घरी येताच वहिनीला पुन्हा प्रियकरासोबत पकडले; मग, हद्दच केली पार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या गया जिल्ह्यात तुरुंगातून सुटलेल्या एका दीराने आपल्या भावजयीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडले. या संतापात त्याने आपल्या वहिणींसह त्या युवकाची गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे, 6 महिन्यांपूर्वी याच भावजयीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिला छतावरून फेकून दिले होते. या प्रकरणात त्याला 6 महिन्यांची शिक्षा झाली होती. तुरुंगातून सुटताच तो घरी गेला तेव्हा त्याची वहिणी एका तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. यावर तो इतका खवळला की आपल्या मित्रांना घरात आणून त्याने हा कांड केला. आरोपी सध्या फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. 


असे आहे प्रकरण...
> गया जिल्ह्यातील एका गावात संजय मांझी आपली पत्नी मनोज देवी (35) आणि भाऊ विजय मांझी यांच्यासोबत राहत होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून मनोज देवीचे गावातच राहणाऱ्या मोहम्मद नजीब नावाच्या एका युवकाशी विवाहबाह्य संबंध होते. पती संजय हॉटेलवर जाताच ती लपून नजीबला घरी बोलवयाची. सहा महिन्यांपूर्वी विजय मांझीला त्याच्या शेजाऱ्यांनी तुझ्या वहिनींचे एका युवकासोबत अवैध संबंध असल्याची माहिती दिली. विजय मांझीचा संशय वाढत गेला आणि एक दिवस त्याने रागाच्या भरात भावजयी मनोज देवीला ठार मारण्यासाठी छतावरून फेकून दिले. 
> विजयला हत्येचा प्रयत्न आणि हल्ला प्रकरणी तुरुंगात जावे लागले. 6 महिने शिक्षा भोगून तो आपल्या घरी परतला. यावेळी त्याने पुन्हा त्याच युवकासोबत आपल्या भावजयीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यावर संतापलेल्या विजयने आपल्या चुलत भावांसह 4 जणांच्या मदतीने घरात घुसून मनोज देवी आणि नजीब या दोघांना गोळ्या झाडल्या आणि ठार मारले. घटनेच्या वेळी दुसऱ्या एका खोलीमध्ये महिलेचा भाऊ आपल्या पत्नीसोबत होता. त्याने वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्याच्यावर सुद्धा गोळ्या झाडल्या. यात तो जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


पतीला काही पत्ताच नाही...
पोलिसांनी घटनास्थळाचा तपास करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच शवविच्छेदनापूर्वी चौकशीसाठी पतीला पोलिस स्टेशनला बोलवाले. यावेळी शेजाऱ्यांनी देखील पोलिसांकडे गर्दी केली होती. सर्वांमध्ये चर्चा होती की गेल्या अनेक वर्षांपासून मनोज देवीचे अफेअर होते. परंतु, पोलिसांशी बोलताना आपल्याला पत्नीच्या अफेअरची माहितीच नव्हती असे पतीने सांगितले. मग, 6 महिन्यांपूर्वी पत्नीला छतावरून का फेकण्यात आले यावर प्रश्नावर तो प्रॉपर्टीचा वाद होता असे पती म्हणाला. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...