आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youth Kills Wife And Cousin Over Extramarital Affair, Surrenders Overnight In Rajasthan

रात्री 3 वाजता पोलिस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला; पत्नीसह मावस भावाचा खून करून आलोय, मला फाशी द्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगंगानगर - राजस्थानच्या एका पोलिस स्टेशनमध्ये रात्री 3 वाजता येऊन युवकाने आत्मसमर्पण केले. त्याने पोलिसांकडे दोन-दोन खून केल्याची कबुली दिली. सविस्तर चौकशी केली तेव्हा आरोपीने आपली पत्नी आणि मावस भावाचा खून केला असे समोर आले. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. तसेच त्याची पत्नी मावस भावासोबत राहत होती. त्याच रागाच्या भरात त्याने मावस भावासह पत्नीचा खून केला. आपल्याला फाशी झाली तरीही काहीच चिंता नाही असे त्याने पोलिसांना सांगितले.


पोलिसांनी त्याच रात्री घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. यानंतर ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. आरोपी गुरतेज सिंगने आधी आपला मावस भाऊ सर्वजीत उर्फ गुरसाहब सिंगला विटांनी ठेचून ठार मारले. नंतर पत्नी गगनदीप कौरच्या ओढणीने तिचा गळा आवळला. पीडित गगनदीपचे वडील साधू सिंग आणि गुरासाहबचे वडील गुरतेज सिंग यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या डबल मर्डरने परिसरात एकच खळबळ उडाली. मर्डरचे वृत्त मिळताच स्थानिक रात्रभर झोपले नाही. 


काय म्हणाला आरोपी..?
आरोपी गुरतेज सिंगने पोलिसांना सांगितले, की ''मावस भाऊ सर्वजती आणि माझे रविवारी फोनवर भांडण झाले होते. त्याने मला धमकी दिली होती की तो रात्रीच माझ्या पत्नीला पळवून नेत आहे. रात्रीच त्यांनी बस पकडली असा दावा केला. मी त्याच बसमध्ये लपून बसलो होतो. घडसाना गावात पोहोचल्यानंतर ते पायी जात होते. मी बराच वेळ त्या दोघांचा पाठलाग केला. ते वस्तीतून बाहेर कधी पडतील याची वाट पाहत होतो. यानंतर मी सर्वजीतच्या डोक्यात वीट भिरकावली. खाली कोसळताच त्याचा जीव जाईपर्यंत विटांनी त्याच्या डोक्याचा भुगा केला."


पत्नीवर दया आली, मग...
गुरतेज पुढे म्हणाला, "माझी पत्नी इतकी घाबरली होती की ती तेथे काहीच हालचाल न करता थांबली होती. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने सर्वजीतच्या हत्येचा आरोप स्वतःवर घेणार असे आश्वासन दिले. तिचे असे बोलणे ऐकूण मला तिच्यावर दया आली. काही पावले तिच्यासोबत चालून थोडासा दूर गेलो. मग, अचानक माझ्या डोक्यात विचार आला, की ही माझी आणि लेकरांची होऊ शकली नाही. अशात पोलिसांसमोर आपल्या जबाबावर ठाम राहील याची काय शाश्वती. ती नक्कीच माझ्या विरोधात साक्ष देणार याची मला खात्री होती. त्यामुळे, वाटेतच तिच्या ओढणीने तिचा गळा आवळला.''

 

दीड महिन्यापूर्वीच जुळले दीर-भावजयीचे अनैतिक संबंध
> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरतेज आणि आणि गगनदीप कौर यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. या दोघांना 2 मुले सुद्धा आहेत. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात गुरतेज आपल्या मावस भावाच्या घरी सहकुटुंब गेला होता. पत्नीला सोडून तो घरी परतला. या दरम्यान गगनदीपची पत्नी गगनदीप आणि मावस भाऊ सर्वजीत यांच्यात अनैतिक शारीरिक संबंध जुळले. यानंतर त्यांनी हद्दच पार केली. पती गुरतेज पत्नीला घेऊन जाण्यासाठी गावी आला तोपर्यंत ती सर्वजीतसोबत घरातून पळून गेली होती. 
> आरोपीने सांगितल्याप्रमाणे, "आम्ही सहकुटुंब तामकोट येथे मावशीच्या घरी गेलो होतो. त्याच दरम्यान माझ्या आईने माझ्या पत्नीला मावस भावासोबत रंगेहात पकडले होते. माझ्या आईने खोलीत जाऊन सुनेला झापले आणि धिंगाणा घातला. तेव्हा ती शांत डोके ठेवून घटस्फोट घ्या असे म्हणत मोकळी झाली. या दोघांना पंचायतमध्ये बसवण्यात आले. तरीही लव्ह मॅरेज करणारच यावर ते ठाम होते. यानंतर 15 दिवसांपूर्वी घटस्फोटावर आम्ही सहमती दर्शवली होती." परंतु, यानंतरही पत्नीने दिलेल्या दगा फटका गुरतेज सहन करू शकला नाही. त्याने सुनियोजित पद्धतीने दोघांचा खून केला.

 

बातम्या आणखी आहेत...