आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youth Made Friendship With Girl On FB, Tampered With Her Pictures And Sent Her To The Family, Demanded Rs 8 Lakh

युवकाने फेसबुकवर मुलीशी केली मैत्री, तिच्या फोटोसोबत छेडछाड करत कुटुंबीयांना पाठवले; व्हायरल करण्याची धमकी देत 8 लाख रुपयांची केली मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फेसबुकवर एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे एका तरुणीला चांगली महागात पडली. त्या युवकाने युवतीसोबत बरेच फोटो काढले आणि व्हिडिओ तयार केले. यानंतर त्या फोटो आणि व्हिडिओसोबत छेडछाड करत आपत्तीजनक बनवले. युवकाने युवतीचे आपत्तीजनक व्हिडिओ आणि फोटो तिच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअपवर पाठवले आणि त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास फोटोंना सोशल मीडिया आणि परिवाराशी संबंधीत इतर लोकांना पाठविण्याची धमकी देखील दिली. तो म्हणाला की मी सर्वकाही हरलो असून आता नव्याने आयुष्याची सुरुवात करणार आहे. याची मी पूर्वीपासूनच योजना आखली आहे. पुढे बोलतांना तो म्हणाला की, जास्त स्मार्ट होण्याचा प्रयत्न करू नका कारण मी तुमच्यापेक्षा स्मार्ट आहे. दरम्यान युवतीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

 

पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखर करून त्याला अटक केली आहे. अखिल अजयान (26) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 2 मोबाइल आणि लॅपटॉप ताब्यात घेतले. आरोपीने वसूल केलेल्या रकमेसोबत तो ब्राझीलमद्ये गर्लफ्रेंडसोबत सेटल होणार असल्याचा खुलाला चौकशीत केला. 

 

युवकाने मुलीप्रती आपले प्रेम देखील व्यक्त केले होते

पोलिसांना दिलेल्या विधानात 50 वर्षीय तक्रारकर्त्यांनी सांगितले की, ते आपल्या परिवारासोबत विकासपुरी येथे राहतात. ते एका अभियांत्रिकी महाविद्यालात प्राध्यापक आहेत. 2017-18 मध्ये त्यांच्या मुलीली एका युवकाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मुलीने ती स्वीकारली. दरम्यान दोघांमध्ये संभाषण वाढले आणि त्यांच्यात मैत्री झाली. त्या युवकाने मुलीप्रती प्रेम देखील व्यक्त केले होते. 

 

व्हॉट्सअप नंबरच्या मदतीने आरोपीला केली अटक 

अखिल अजयान असे आरोपीचे नाव असून तो मुळतः केरळचा रहिवासी आहे. तो गेल्या वर्षी फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात दिल्लीत आला होता. त्याने तक्रारदाऱ्यांच्या मुलीसोबत काही फोटो काढले आणि व्हिडिओ देखील बनवले. यानंतर त्याने मुलीच्या फोटोसोबत छेडछाड करून त्यांनी अश्लील बनवले. हे व्हिडिओ त्याने आपल्या कानडी मित्रांना पाठवले होते. अखिलने 1 जानेवारी 2019 रोजी ते अश्लील फोटो व व्हिडिओ मुलीच्या परिवारातील अनेक सदस्यांना पाठवले. दरम्यान त्याने 8 लाख रूपयांची मागणी केली. पीडितेच्या तक्रारीवरून 27 मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला व्हॉट्सअप नंबरच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.