आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youth Married Girl And Reped Her With His Friends On Multiple Locations, Police Registered 9 Cases

कॉलेजमध्ये त्याने सोबत शिकणाऱ्या तरूणीबरोबर केला प्रेम विवाह, इथपर्यंत सर्व ठीक होते परंतू यांनतर जे झाले त्याचा विचार करूनच हादरते तरूणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जींद (हरियाणा) - एका युवकाने गावातीलच महाविद्यालयातील विद्यार्थ्यीनीशी प्रेम विवाह केला. त्यानंतर तिला हिसार आणि मग हिमाचल प्रदेश येथे नेले. तेथे गेल्यावर त्याच्या मित्रांसमवेत पीडितेवर बलात्कार केला. रविवारी विद्यार्थ्यीनी नराधमांच्या तावडीतून सुटका करून पोलिसांत गेली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून 9 जणांविरुद्ध विविध कलमांआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

पीड़िता ने पोलिसांना सांगितली आपबीती 
पीडिताने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हणले आहे की, ती कॉलेजमध्ये शिकायला आली असता तिच्याच गावातील दिपक आणि त्याचे मित्र दर्शन आणि राजीव तिला फूस लावून घेऊन गेले. तद्नंतर हिसार येथे तिच्यासोबत कट रचून दीपकने तिच्यासोबत प्रेम विवाह केला. दरम्यान. दीपक शिवाय त्याचा भाऊ हिमांशु, अजय, दर्शन, राजीव, प्रवीन तिथे उपस्थित होते. दरम्यान, दीपकचे वडील सतीशने तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर प्रवीन, जसबीर, सचिन आणि हिमांशूने तिच्यावर बलात्कार केला. मग तिला हिमाचल प्रदेश मधील ऊना येथे घेऊन गेले. तेथेही दीपक आणि अजयने कित्येक दिवस पीडितेवर बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक, त्याचा भाऊ हिमांशु, त्याचे वडील सतीश आणि त्याचे मित्र अजय, दर्शन, राजीव, प्रवीण, सचिन, जसबीर यांच्याविरूद्ध कट रचणे, विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिस करत आहेत प्रकरणाचा तपास
पीडिताचे मेजिस्ट्रेट समक्ष कबुलीजबाब घेण्यात येत आहेत. पीडिताने यापूर्वी गावातील दीपकशी प्रेम विवाह केला होता. विवाहानंतर बरेच दिवस त्याच्यासोबत सेफ हाउसमध्ये राहिली होती. पण आता तिच्यासोबत कट रचण्याचा आणि बऱ्याच युवकांवर गैरवर्तन करण्याचा आणि बलात्काराचा आरोप करत आहे. पोलिस प्रकरणाची चौकशी करत असल्याचे महिला पोलिस अधिकारी राजेश कुमारी यांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...