Murder: उजव्या हातात / Murder: उजव्या हातात रुद्राक्षमाळा व हातावर अक्षय नाव; कृष्णगाव येथे युवकाचा दगडाने ठेचून खून

Feb 05,2019 10:37:00 AM IST

दिंडोरी, वणी - कृष्णगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीत असलेल्या जलवाहिनीच्या लिक वाॅलजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला असून, दगडाने ठेचून युवकाचा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सुभाष कुवर हे स्कूल बस घेऊन वणी-दिंडोरी रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असताना कृष्णगाव परिसरात रस्त्याच्या कडेला बस उभी करून ते लघुशंकेसाठी थांबले असता त्या ठिकाणी युवकाचा मृतदेह पाहिला. त्यांनी त्वरित वणी पोलिसांना ही माहिती दिली. सहायक निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. उजव्या हातात रुद्राक्षमाळा व हातावर अक्षय नाव, काळी जिन्स, लाल शर्ट, निळे जर्कीन, चेहऱ्यावर दगडाने मारल्याने ओळखू न येण्याइतपतच्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.


X