आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: मोबाइलच्या वादातून घेतला एकाचा जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मोबाइलच्या किरकोळ भांडणाने एकाचा जीव घेतल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील बोरदा येथे उघडकीस आली. बोरदा येथील श्यामलाल तोटा हा जीवतीचा सण असल्यामुळे रविवारी सायंकाळच्या सुमारास बाहेर गेले. दरम्यान तोटा यांची पत्नी मुंगनीबाई घरात स्वयंपाक करीत असताना तिला पतीच्या ओरडण्याचा आवाज एेकू आला. त्यामुळे मुंगनीबाई घराबाहेर आली असता पती श्यामलाल व गेंदालाल नंदलाल कास्देकर यांच्यात झटापट सुरू असल्याचे दिसून आले. श्यामलाल व गेंदालाल यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांच्या मोबाइलच्या कारणावरून भांडण सुरू होते.

 

दरम्यान, मुंगनीबाई भांडण सोडविण्यासाठी गेली असता गेंदालालने श्यामलालला लोटून िदले. त्यानंतर श्यामलालला सिमेंटच्या रस्त्यावर आपटून त्याच्या छातीवर बसून हाताने गळा दाबला. त्यानंतर छातीवर, पोटावर व मानेवर जबर मारहाण केली. यात श्यामलाल बेशुद्ध पडला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंगनीबाई यांच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि. १४) गेंदालाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...