Maharashtra Crime / परळीत प्रेम संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, अल्पवयीन आरोपींनी ब्लेडने वार करुन दगडाने ठेचले


बहिणीसोबत प्रेम असल्याचा आरोपीच्या मनात राग होता 

दिव्य मराठी वेब

Sep 02,2019 10:53:26 PM IST

परळी- बीड जिल्ह्यातील परळीमध्ये एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार उघडीस आला आहे. अनिल हालगे(22) असे मृत तरुणाचे नाव असून, बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेम संबंधाच्या रागातून अल्पवयीन भावाने अनिलचा खून केल्याचे समोर आले. खूनाच्या पाच तासांच्या आत पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केले आहे.

आज सगळीकडे गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. पण परळी शहरात सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. गणेशपार भागात राहणाऱ्या अनिल हालगे नावाच्या तरुणाचा मृतदेह पोलिस स्टेशनच्या बाजुला असलेल्या कब्रस्तानमध्ये आढळून आला. तरुणाच्या अंगावर हत्याराने मारल्याच्या खूना पोलिसांना आढळून आल्या.

याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोन आरोपींपैकी एकाच्या बहिणीसोब अनिलचे प्रेम संबंध होते आणि त्याच रागातून आरोपीने अनिलचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. अनिलच्या शरिरावर दाढी करायच्या ब्लेडने वार करण्यात आले, तसेच त्याला दगडाने ठचण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

X
COMMENT