आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिंटिंगला पैसे नव्हते म्हणून..हाताने बायोडाटा लिहिला, 20 पेक्षा जास्त ऑफर्स मिळाल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्यूनस आयर्स - अर्जेंटिनातील एका २२ वर्षीय तरुणाकडे रिझ्यूम व प्रिंट तयार करण्यासाठी पैसे नव्हते. त्याने हाताने रिझ्यूम लिहिला व मुलाखतीस गेला. त्याची कल्पकता पाहून त्याला २० पेक्षा जास्त लोकांनी नोकरीसाठी ऑफर्स दिल्या.

 

कार्लोस दुआर्टे नावाच्या या तरुणाने म्हटले, मी काही जास्त शिकलेलो नाही. माझ्याकडे कॅफेत काम करण्याची ऑफर होती. परंतु माझ्याकडे रिझ्यूम तयार करण्यासाठी पैसे नव्हते. मी हाताने रिझ्यूम लिहून मुलाखतीस गेलो. तेव्हा युजिनिया लोपेज नावाच्या महिलेने त्याचा सीव्ही सोशल मीडियावर पोस्ट केला. या रिझ्यूमला १० हजारपेक्षा जास्त लोकांनी शेअर केले.

बातम्या आणखी आहेत...