आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४९ दिवस समुद्रातील नावेत अडकला तरुण, जिवंत राहण्यासाठी मासे पकडून खाल्ले, शर्ट भिजवून समुद्राचे पाणी प्यायला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता- १९ वर्षाचा इंडोनेशियाचा तरुण ४९ दिवस प्रशांत महासागरातील एका नावेत अडकला होता. त्याला पनामा फ्लॅग व्हिसलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचा जीव वाचवला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले. नंतर त्याला जपानला पाठवून दिले. तेथून ८ सप्टेंबर रोजी त्याला त्याच्या घरी पाठवण्यात आले. या तरुणाचे नाव आल्दी नोव्हेल अादिलांग असे आहे. तो इंडोेनेशियातील सुलावेसीचा रहिवासी आहे. त्याने आपबीती सांगितली, जिवंत राहण्यासाठी मला लाकडाने समद्रातील मासे पकडून खावे लागले. समुद्राच्या पाण्यात शर्ट भिजवून ते पाणी पित होतो. आल्दी एका मासे पकडणाऱ्या बोटीवर दिवे पेटवण्याचे काम करतो. नावेवर बसवलेले दिवे माशांना आकर्षित करतात. हे स्थान समुद्रापासून १२५ किमी आत आहे. 


त्याला शोधण्यासाठी १० जहाजे पाठवली
ओसाका येथील इंडोनेशियाई राजदूतांनी तरुणाचा शोधार्थ १० जहाजे पाठवली होती. ४९ दिवसांनंतर एका दलाने त्याला गुआम येथून शोधले. इंडोनेशियन मुत्सद्दी फझर फिरदौस म्हणाले, अनेक जहाजे आल्दीच्या जवळून गेली. त्याने कपडे हलवून थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. 


३ वर्षांपासून करतो काम
वडिलांनी सांगितले, अाल्दी गेल्या तीन वर्षांपासून तेथे काम करतो. एक तरंगत्या हटद्वारे तो मासे पकडण्यास जात असे. त्याच्यासोबत काही सहकारी होते. 


आईवडिलांची शिकवण
१४ जुलै रोजी रात्री सोसायट्याचे वारे सुटले. माझे तरंगते हट समुद्रात भरकटले. माझ्याकडे खाण्यापिण्याचे साधन नव्हते. काही दिवस उपाशी राहिलो. भूक भागवण्यासाठी लाकडे टोचून मासे पकडले. हटमध्येच लाकडे जाळली, त्यावर मासे भाजून खाल्ले. खारे पाणी पिण्यासाठी शर्ट भिजवून ते पाणी प्यालो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा खारटपणा कमी होतो.  मला मदत मिळाली नाही, तेव्हा वाटले आपण वाचणार नाही. समुद्रात उडी टाकून आत्महत्या करण्याचाही विचार मनात आला. त्याच वेळी मात्यापित्यांची शिकवण कामी आली. ते म्हणत असत, संकटकाळी देवाचे नाव घ्यावे. 
-आल्दी नोवेल आदिलांग

बातम्या आणखी आहेत...