आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर/आमेर - येथे एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री एका युवकाने आपल्या प्रेयसीच्या तोडांत बोळा कोंबून तिची गळा आवळून हत्या केली. नंतर स्वतः गळफास घेतला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हेमा धानका (वय 30 वर्ष) आणि प्रकाश जाखड (वय 25 वर्ष) असे दोघांचे नाव आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
पोलिस स्टेशन प्रभारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की प्रकाश जाखड फतेहपूर येथील रहिवासी होता. तर युवती हेमा ऋषिगालव येथे राहत होती. दोघांनी शुक्रवारी सायंकाळी शाम हॉटेलमध्ये 1000 रूपये किरायावर खोली करून थांबले होते. सकाळी हॉटेलचे कर्मचारी खोलीचा दरवाजा ठोठावला असता आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर हॉटेलने पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खिडकी तोडून खोलीत प्रवेश केला असता युवकाने गळफास घेतल्याचे तसेच युवती पलंगाजवळ मृतावस्थेत आढळून आली. युवतीच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबलेला होता.
रजतने अगोदर महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेतल्याचे पोलिसांचे मानने आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
पतीसोबतच्या भांडणामुळे भावाकडे राहत होती युवती
हेमाचे पतीसोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. यामुळे ती एक महिन्यापासून आपल्या भावाकडे राहत होती. रजतच्या बॅगमध्ये पोलिसांना एक गावठी पिस्तुल देखील आढळले असून ते त्यांनी जप्त केले आहे.
युवतीच्या पतीकडे कर्जाचा हप्ता घेण्यासाठी जात होता युवक
रजत एका फायनान्स कंपनीत कलेक्शनचे काम करत होता. रजत महिलेचा पती राजेशकडे कर्जाचे हप्ते घेण्यासाठी जात होता. यादरम्यान दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.