आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन भुसावळातील तरुणाची आत्महत्या, रेल्वेत अॅप्रेंटीसशीप केल्यानंतरही मिळाली नाही नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- यावल-भुसावळ दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पुलावरून 28 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. भूपेंद्र मुकुंदा बोंडे (रा.शिव कॉलनी, भुसावळ) असे आतम्हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ती घटना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

 

आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून सदर तरुणाने रेल्वेमध्ये अॅप्रेंटीसशीप केली व नोकरीच्या शोधात होता. नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे. फैजपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार गोकूळ तायडे, रमण सुरळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे.

 

भूपेंद बोंडे याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. भूपेंद्र याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत फैजपूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...घटनेशी संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...