आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव तारी त्याला कोण मारी : शौचास जंगलात गेलेल्या तरुणावर वाघाने केला हल्ला, पाळीव कुत्र्याने अशाप्रकारे वाचवले प्राण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिवनी (मध्य प्रदेश) - 'देव तारी त्याला कोण मारी' असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशच्या सिवनी येथे घडला. येथे एका कुत्र्यामुळे एका तरुण वाघाच्या हल्ल्यातून बचावला. पण युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. शनिवारी सकाळी शौचाहून जंगलातून परतत असताना वाघाने या 22 वर्षीय युवकावर हल्ला केला. युवकासोबत असणाऱ्या कुत्र्याने वाघावर भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी आले. यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. 


 

युवकाला गंभीर दुखापत 
वनविभागाचे अधिकारी टी.एस.सुलिया यांनी सांगितले, की कुरई वन परिक्षेत्र अंतर्गत परासपानी भागात शनिवारी सकाळी पंचम गजबे हा युवक शौचास गेला होता. यावेळी त्याचा कुत्रा देखील त्याच्यासोबत होता. दरम्यान वाघाने युवकावर हल्ला चढवला. पण कुत्र्याच्या सतत भुंकण्यामुळे आणि ग्रामस्थ तेथे आल्यामुळे वाघ जंगलात पळून गेला. वाघाच्या हल्ल्यात युवकाच्या दोन्ही हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.