आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youth Takes Last Breathe Video Calling Wife Before He Dies In Road Accident In Bihar

इयरफोन लावून बाइक चालवताना ट्रकने चिरडले, पत्नीला शेवटचा व्हिडिओ कॉल करून घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - रस्त्यावरून पायी किंवा बाइक चालवताना इयरफोन वापरणे किती घातक ठरू शकते याची विविध उदाहरणे अपघातांतून समोर आली आहेत. हायवे, रेल्वे रूळ आणि रस्त्यांवर इयरफोन घातल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा पत्ता लागत नाही. अशा घटनांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. अशीच आणखी एक घटना बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात घडली आहे. येथे एक युवक बाइक चालवताना इयरफोनमध्ये गाणी ऐकत होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला चिरडले. या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. परंतु, त्याने मृत्यूपूर्वी त्याने जे काही केले ते क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


पीडित युवक बेगुसरायच्या हायवे क्रमांक 28 वरून कानात इयरफोन घालून बाइक चालवत होता. मागून एक भरधाव ट्रक येत असल्याचा त्याला पत्ताच लागला नाही. ट्रकने हॉर्न दिले पण त्याला काहीच ऐकू आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, ट्रकने मागून धडक दिल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला. त्याचे पाय ट्रकच्या चाकाखाली आले होते. एक पाय चेंदामेंदा झाले होते. अशा अवस्थेत सुद्धा त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढून थेट पत्नीला व्हिडिओ कॉल केला.


युवकाचे नाव राजाराम पंडित होते. तीन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. त्याला एक सात महिन्यांची मुलगी देखील आहे. राजाराम आपल्या मेव्हण्याच्या श्राद्ध कार्यक्रमासाठी सासरवाडीच्या दिशेने निघाला होता. निघण्यापूर्वी त्याने पत्नीला कळवले होते. परंतु, कानात इयरफोन असल्याने त्याचा दुर्दैवी अपघात घडला. त्यामुळेच, त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल करून आपल्या अपघाताची माहिती दिली. स्थानिकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, अतीरक्तस्राव आणि दुखापतीमुळे त्याला वाचवता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...