Maharashtra Crime / दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन प्रेयसीचा खून करुन पसार झालेल्या आरोपीची आत्महत्या, इंद्रायणीत सापडला मृतदेह

लॉजवर नेऊन अल्पवयीन प्रेयसीवर ब्लेडने वार केले होते

Sep 06,2019 05:24:00 PM IST

पुणे- दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचा लॉजमध्ये नेऊन खून केलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मुलीच्या खूनानंतर पोलिस या तरुणाच्या शोधात होते. आता 48 तासांनंतर त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. पोलिसांची सहा पथके तरुणाच्या शोधात होती. "आपले पहिले आणि अखेरचे प्रेम संपले असून मी या जगाचा निरोप घेतोय", असे व्हॉट्सअप स्टेटस या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी ठेवले होते. यानंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन या तरुणाने जीवन संपवले.

प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा खून करुन प्रियकर पसार झाला होता. पुणे जिल्ह्यात मावळमधील वडगाव एमआयडीसी रोडवर असलेल्या ‘निसर्गवारा स्पॉट ऑन’ लॉजवर बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक जोडपे आले. ते जोडपे लॉजमधील रुम नंबर 303 मध्ये थांबले होते. लॉजवर आलेली तरुणी ही शाळेच्या गणवेशातच आली होती. थोड्या वेळानंतर त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून तरुणाने तरुणीच्या गळ्यावर, हातावर आणि पोटावर ब्लेडने वार केले, यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी श्रीराम गिरी लॉजमधून पळून गेला. त्यानंतर आता त्याचा मृतदेह हाती आला.

X