Home | Maharashtra | Vidarva | Akola | youth who lived at relatives cheating with them of Rs 2.5 lakhs

शिक्षणासाठी नातेवाइकांकडे राहणाऱ्या युवकाने अडीच लाख रुपयाने गंडवले

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 11:55 AM IST

नात्यातील युवक पोलिस भरतीसाठी व शिक्षणासाठी नातेवाइकाकडे आला. नातेवाइकांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याची चांगली सोय घेत

  • youth who lived at relatives cheating with them of Rs 2.5 lakhs

    अकोला- नात्यातील युवक पोलिस भरतीसाठी व शिक्षणासाठी नातेवाइकाकडे आला. नातेवाइकांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याची चांगली सोय घेतली. मात्र त्याने विश्वासघात करून बॅक खात्यातून परस्पर लाख रुपये काढले व दीड लाख रुपयांची सोनसाखळी घेऊन पोबारा केला. महिलेच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी नातेवाईक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


    शालुबाई लक्ष्मण जाधव (वय ५०, व्यवसाय घरकाम रा.जुना आरटीओ रोड गौतम नगर) यांचे पती मुंबई येथे कामाला जात असतात व त्यांचे मजुरीचे पैसे तेथूनच बँक खात्यात टाकतात. नंतर एटीएम कार्डमधून शालुबाई पैसे काढून प्रपंच चालवतात. त्यांची दोन्ही मुले लहान आहेत. गेल्या वर्षी शालुबाईच्या मामेभावाचा मुलगा आकाश मनोहर कुऱ्हाडे (रा.गव्हा ता.मानोरा जि.वाशीम) हा पोलिस भरती करीता व आयटीआयचे शिक्षणाकरिता त्यांच्याकडे आला होता.


    जवळचा नातेवाईक असल्याने शालुबाईंनी त्याला घरच्या सदस्याप्रमाणे वागवले. शालुबाई त्याला बँकेतून पैसे काढण्यासाठी पाठवत असत. एटीएममधून त्याने पैसेही आणले होते. त्याच्यावर विश्वास बसल्याने शालुबाई यांनी ४८ ग्रॅम सोनसाखळी वापरावयासही दिली होती. बजाज फायनान्सवर त्यांनी टिव्ही घेतला असल्याने बजाज फायनान्स कंपनीचे एजंट त्यांचे घरी आले आणि तुमचा चेक बाऊन्स झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी खात्यात पैसे असतानाही चेक बाऊन्स कसा झाला म्हणून आकाशला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. खात्यातील एक लाख रुपये त्याने परस्पर काढल्याचे लक्षात आले. काय करायचे ते करून घ्या, असा पवित्रा आकाशने घेतल्याने शालुबाई यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी खदान ठाणे गाठून आकाश ज्ञानेश्वर कुऱ्हाडे याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध भादंवि कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Trending