आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तास ऊसाच्या मशीनमध्ये फसला होता हात, मशीनसह हॉस्पीटलमध्ये केले दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीमकाथाना (सीकर) - येथे ऊसाचा रस काढताना एका युवकाचा हाथ मशीनमध्ये फसला. आसपासच्या लोकांनी तत्काळ मशीन बंद केली पण तोपर्यंत हाथ मशीनमध्ये फसल्याने रक्तस्त्राव झाला. संपूर्ण हात मशीनमध्ये गुंडाळल्या गेला होता. 

 

अशोक कॉलनीत राहणारा मुरकरीराम (18) रसवंतीगृहावर काम करतो. रविवारी दुपारी तो ग्राहकाला ज्युस देण्यासाठी मशीनमध्ये ऊस टाकत होता. दरम्यान अचानक ऊसासह त्याचा हाथ मशीनमध्ये फसला. त्याचे ओरडणे ऐकून लोकांची गर्दी जमा झाली. 

 

मशीनमधून हात बाहेर काढण्यासाठी दोन तास प्रयत्न 

युवकाचा हात मशीनमधून बाहेर काढण्यासाठी लोक दोन तासांपासून प्रयत्न करत होते. कटर मशीनने रसवंतीची मशीन कापली पण यानंतरही हात काढता आला नाही. यानंतर लोकांनी युवकाला मशीनसह अॅम्बुलन्समधून रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर मशीनमध्ये फसलेला युवकाचा हाथ बाहेर काढण्यात आला. त्याचा हात दंडापासूनच वेगळा करण्यात आला. डॉक्टरांनी त्याला गंभीर अवस्थेत जयपूरला हलविले.

बातम्या आणखी आहेत...