आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Budhala News: Youths Handed Over Parcel Bomb And Letter To A House Asked For 20 Lakhs Ransom, Police Defused Bomb And Investigating

व्यवसायिकाच्या घरी 2 अज्ञात युवक देऊन गेले एक पार्सल आणि चिठ्ठी, पार्सल उघडताच परिवाराच्या पायाखालची वाळू सरकली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - बुढलाडाच्या हजारीवाला कारखाना परिसरात गुरूवारी दुपारच्यावेळी दोन अज्ञात युवक एका वृद्ध महिलेला एक पार्सल आणि धमकी लिहीलेले पत्र देऊन फरार झाले. घरातील मंडळींनी पार्सल उघडल्यानंतर त्यात दोन बॉम्बचे डब्बे मिळाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एवढेच नाही तर त्यासोबत दिलेल्या पत्रात परिवाराकडे 20 लाख रूपयांचा खंडणी मागितली. पैसे न दिल्यास घर उडविण्याची धमकी दिली. परिवाराने तत्काळ बुढलाडा शहर पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने जवळपासची सर्व घरे रिकामी केली आणि बॉम्ब शोध पथक तसेच श्वान पथकाला पाचारण केले.  


रतिया रुग्णालयात खंडणी देण्यास सांगितले
हजारी वाला कारखाना परिसरातील एका घरी दोन टोपी घातलेल्या युवकांनी घरातील शकुंतला देवी यांना तुमचे पार्सल आल्याचे सांगत एक बंद डबा त्यांच्या हातात दिला. त्यासोबत एक चिठ्ठीही दिली. महिलेचा मुलगा सोनू घरी आल्यानंतर त्याला पार्सल आणि पत्राबद्दल सांगितले. सोनूने पार्सल उघडताच त्यात दोन बाम्ब सारखी गोष्ट होती. सोबत दिलेले पत्र वाचले असता त्यात 20 लाख रूपये शनिवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हरियाणाच्या रतिया येथील सरकारी रूग्णालयाच्या पाठीमागे देण्यास सांगितले होते. पैसे न दिल्यास घर उडविण्याची धमकी दिली होती. अचानक धमकीचे पत्र मिळाल्यामुळे परिवाराला घाम फुटला होता. त्यांनी तत्काळ पोलिसांना संबंधीत घटनेची सुचना दिली. 

 

> घटनेची माहिती मिळताच एसएसपी मानसा मनधीर सिंह, ठाणे इंचार्ज मोहन लाल, गुरमित सिंह आदींसह अन्य पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिवाराच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोबतच पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले होते. पथकाने संध्याकाळी पाच वाजता दोन्ही बॉम्ब निष्क्रीय केले.

 

बातम्या आणखी आहेत...