आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून पेटवले तरुणाच्या आईचे घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून स्वातंत्र्यदिनी, बुधवारी (दि. १५) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कवाडव्हाण येथील संशयित तरुणाच्या आईचे घर गावातीलच एका व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून घर जाळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुक्यातील कवाडव्हाण येथील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या मुलाचे गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. याच संबंधातून युवकाने त्या मुलीला पळवून नेल्याचा मुलीच्या घरच्यांच्या आरोप आहे. या प्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात संशयीत युवकाविरुद्ध काही दिवसांपूर्वी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिलेच्या मुलाने अल्पवयीन मुलीला प्रेम प्रकरणातून पळवून नेल्याच्या संशयावरून गावातील एका व्यक्तीने बुधवारी सायंकाळी त्या महिलेचे घर पेटवून दिले. व्यक्तीने महिलेचे घर जाळल्याने लागलेल्या आगीत घरातील सर्व उपयोगी वस्तुंसह धान्याची राख रांगोळी झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चांदूर रेल्वे येथून अग्निशामक बंबालाही पाचारण करण्यात आले होते. फियादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून घराला आग लावणाऱ्या गावातीलच एका व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

 

तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ
माझे घर मुलीच्या बापाने जाळले आहे. मला तो जीवे मारण्याचे धमक्या देतो. मी पोलिसात तक्रार करायला गेली असता, पोलिस टाळटाळ करत होते. अखेर तक्रार नोंदवून घेतली. गेल्या तीन महिन्यांपासून माझे कुटुंब दहशतीत वावरत असून, आरोपींकडून आमच्या जिवीताला धोका असल्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही फिर्यादी पीडीत महिलेने केली आहे.

 

महिलेला मारहाण केली नाही
महिलेला पोलिसांनी मारहाण केली नाही तर केवळ चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. आम्ही तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केली नाही. या प्रकरणी आम्ही तपास करीत आहोत.
- सतीश जाधव, ठाणेदार, तिवसा

 

बातम्या आणखी आहेत...