आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाच्या चॅलेंजमधून कुणाचा तरी फायदा; धोका असल्याने 'यू-ट्यूब'कडून बंदी 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  हल्ली सोशल मीडियावर '#10YearsChallenge' ची क्रेझ असून, यात लोक स्वत:च्या अलीकडच्या छायाचित्रांची १० वर्षे जुन्या छायाचित्रांशी तुलना करत आहेत. सुमारे ५.५ कोटी युजर्सनी या हॅशटॅगसह फेसबुक व इन्स्टाग्रामवर आपापली छायाचित्रे पोस्ट केली आहेत. याबाबत तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ मानत आहेत की, हे चॅलेंज व्हायरल करण्यामागे फेसबुकचाच हात आहे, तर फोर्ब्ज मासिकानुसार फेसबुकने फेशियल रेकग्निशन डेटा जमवण्यासाठी हे चॅलेंज सर्वत्र पसरवले आहे; परंतु फेसबुकने याचे खंडन केले आहे. 

 

बहुतांश आव्हानांमागे एखादी मार्केटिंग एजन्सी असते, जी कोणतेही उत्पादन, गाण्यांचा व्हिडिओकिंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशा प्रकारचे चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल करते. मात्र, अशा प्रकारच्या आव्हानांशी निगडित धोके पाहता यू-ट्यूबने काही चॅलेंजेसवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

हे आहेत चर्चित चॅलेंज 
आइस बकेट चॅलेंज : 

२०१४ मध्ये 'एम्यूट्राफिक लेटरल स्लेरोसिस' (एएलएस) नावाच्या आजारावर संशोधनासाठी निधी जमवण्याकरिता हे चॅलेंज सुरू केले गेले. त्यात १.७ कोटीहून जास्त लोकांनी स्वत:च्या डोक्यावर बर्फाचे पाणी टाकत असतानाचे व्हिडिओअपलोड केले. यात बिल गेट्स, ओबामा यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तीही होत्या. या माध्यमातून एएलएस असोसिएशनने समर्थकांकडून ८०० कोटींहून अधिकचा निधी जमवला. 

 

बर्ड बॉक्स चॅलेंज : 
नेटफ्लिक्सचा सिनेमा 'बर्ड बॉक्स' वरून प्रेरित होऊन नागरिक डोळ्यांवर पट्टी बांधून वाहन चालवतानाचे व्हिडिओबनवत आहेत. यातून चित्रपटाच्या बाजूने अनुकूल वातावरण तयार होतेय; परंतु आता या चॅलेंजसाठी व्हिडिओबनवताना होणाऱ्या अपघातांच्या बातम्या येत आहेत. यू-ट्यूबने या चॅलेंजवर बंदी आणली आहे. तसेच नेटफ्लिक्सनेही हे चॅलेंज बंद करण्याचे आवाहन केलेय. 

 

किकी चॅलेंज : 
गत जुलै-ऑगस्टमध्ये व्हायरल झाले. गायक ड्रेकचे गाणे 'इन माय फीलिंग्ज' ची ओळ 'किकी डू यू लव्ह मी...' वर लोक धावत्या कारमधून उतरून नृत्य करत. भारतातही हे चॅलेंज प्रसिद्ध होत आहे. हे गाणे प्रसिद्ध करण्यासाठीच हे चॅलेंज सुरू केले, असे म्हटले जाते; परंतु ते ड्रेकने नव्हे, तर कॉमेडियन शिगीने सुरू केलेे. या गाण्यास १७ कोटींहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, या चॅलेंजशी संबंधित अपघातही समोर येताहेत. 

 

मॅनेक्विन चॅलेंज : 
सुरुवात ऑक्टो.२०१६ मध्ये फ्लोरिडाच्या विद्यार्थ्याने केली .याच्या व्हिडिओत लोक फ्रीज होऊन मॅनेक्विनसारखे उभे राहत होते व बहुतांश व्हिडिओंत 'ब्लॅक बीटल्स' गाणे सुरू होते. या कारणामुळे हे गाणे पहिल्या क्रमांकावर आले. भारतात वरुण धवन, विराट कोहली व प्रियंका चोप्रासह अनेक मोठ्या सेलिब्रिटीजनी या चॅलेंजचे व्हिडिओसोशल मीडियावर टाकले. 
 
पॅडमॅन चॅलेंज : 
अक्षयकुमारचा चित्रपट ‘पॅडमॅन’ च्या प्रमोशनसाठी हे चॅलेंज सुरू केले गेले. हातात सॅनिटरी नॅपकिन असलेला फोटो काढून तो अपलोड करण्याचे हे चॅलेंज होते.  

 

बँग-बँग डेअर : 
हृतिक रोशनने ‘बँग-बँग’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सेलिब्रिटीजना हे आव्हान दिले. त्यासाठी रस्त्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओ टाकायचा होता.  

 

शशी वाॅज देअर : 
अनुष्का शर्माने ‘फिल्लोरी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका मार्केटिंग एजन्सीच्या माध्यमातून हा ट्रेंड व्हायरल केला.
 

बातम्या आणखी आहेत...