आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • YouTube Shared Report Showing Trends Of 2019, 'Vasta' Join Top 10 Favorite Music Videos List

यू-ट्यूबने शेअर केला 2019 चा ट्रेंड दाखवणारा अहवाल, टॉप-10 आवडत्या म्यूझिक व्हिडियोमध्ये 'वास्ते' सामील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : यूट्यूबने 2019 चा आपला रिवाइंड व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यू्ट्यूब दरवर्षी टॉप म्युझिक, क्रिएटर्स आणि व्हिडिओचा रिवाइंड व्हिडिओ आणि याद जाहीर करते. यंदा यूट्यूबने सर्वाधिक पाहिले गेलेले क्रिएटर्स (व्हिडिओ बनवणारे), सर्वाधिक पसंत केले गेलेले संगीत, नृत्य, खेळ आणि ब्यूटी व्हिडिओची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व याद्यांमध्ये भारताने सर्वाधिक पसंत केले गेलेले संगीत, डान्स, गेम्स आणि ब्यूटी व्हिडिओच्या टाॅप १० लिस्टमध्ये जागा मिळवली आहे. टी-सिरीजचे 'वास्ते' गाणे म्युझिक व्हिडिओच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. तो देशातील दुसरा सर्वाधिक बघितला गेलेला व्हिडिओही आहे. टी-सिरीज कंपनीचे बिझनेस-मार्केटिंग प्रेसिडेंट विनोद भानुशाली सांगतात की, जगभरात सध्या लाइट म्युझिक पसंत केले जात आहे आणि हिंदी लाइट आवाजाने जगात आपले स्थान निर्माण केले आहे. भानुशाली सांगतात की, यामुळेच २०१९ च्या यूट्यूबच्या अहवालानुसार जगातील टॉप टेन पॉप गाण्यांमध्येही टी सिरीजचे 'वास्ते' गाणे आहे. केवळ ८ महिन्यांत या गाण्याला ६३ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. यूट्यूब रिवाइंड लिस्टनुसार देशात २०१९ मध्ये धनुष यांच्या 'मारी-2' या चित्रपटाचे गाणे सर्वाधिक वेळा पाहिले गेले. त्याला ७१ कोटी वेळा पाहिले गेले.

जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्सच्या संख्येवरून क्रिएटर प्यूडीपाय आणि टी-सिरीज यांच्यात नेहमीच स्पर्धा राहिली आहे. मात्र, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या क्रिएटर्सच्या लिस्टमध्ये टी-सिरीजला स्थान मिळू शकले नाही. प्यूडीपाय यात टॉपवर आहे. विशेष म्हणजे यूट्यूबचा गेल्या वर्षीचा रिवाइंड व्हिडिओ सर्वाधिक नापसंत (डिस्लाइक) केलेला व्हिडिओ झाला होता. यामुळे या वेळी यूट्यूबने लाइकच्या आधारावरच रिवाइंड व्हिडिओ बनवला आहे.


देशात सर्वाधिक पाहिली गेलेली गाणी
 

गाणे चित्रपट/गायकव्ह्यूज
राउडी बेबी मारी-271 कोटी
वास्तेध्वनी भानुशाली63 कोटी
शी डॉन्ट नो मिलिंद गाबा38 काेटी
कोका कोला लुका-छिपी38 कोटी
कोका सुख-ई35 कोटी

बातम्या आणखी आहेत...