आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांचा यू-ट्यूबर दानिशच्या मृत्यूच्या दूस-या दिवशी त्याच्या घरी पोहोचले दोन मौलाना, \'म्हणाले तो पाप करत होता, अल्लाहने त्याला शिक्षा दिली\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 21 वर्षांचा यू-ट्यूबर आणि ब्लॉगर दानिशच्या मृत्यूनंतर आता वाद सुरु झाला आहे. दानिशच्या कुटूंबातील सदस्य सांगतात की, काही मौलाना त्यांच्यावर दबाव टाकत आहे. ते म्हणतात की, दानिशच्या यू-ट्यूबवर एक व्हिडिओ मॅसेज अपलोड करा, यामध्ये दानिश चुकीच्या मार्गावत जात होता आणि अल्लाहने त्याला शिक्षा दिली असे सांगा. एका न्यूज वेबसाइटसोबतच्या बोलताना दानिशच्या भावाने हा खुलासा केला. 

 

मृत्यूच्या दुस-या दिवशीच मौलाना दानिशच्या घरी पोहोचले 
- 19-20 तारखेदरम्यान रात्री एका लग्नातून मुंबईमध्ये परतताना दानिशचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 20 तारखेला रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच्या दुस-या दिवशी दोन मौलाना दानिशच्या घरी पोहोचले आणि त्याच्या लाइफस्टाइलची निंदा करु लागले. मोलानांनी दानिशच्या आईला सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करण्यास सांगितला. यामध्ये तरुणांनी दानिशचा मार्ग निवडू नये असा मॅसेज लिहायला सांगितला. दानिशचा भाऊ गुफरान मुल्लाने एका न्यूज वेबसाइटला ही माहिती दिली. तो म्हणाला "मौलाना माझ्या आईला म्हणाला की, दानिश पाप करत होता. मला त्या मौलानांचा राग येत होता, कारण त्यांना माझ्या आईकडून एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर अपलोड करायचा होता."


दानिश म्हणायचा - भाई माझ्यासोबत काय काय होते हे तुला माहिती नाही?
- गुफरान बोलताना म्हणाला, "तो खुप निरागस होता आणि फक्त 21 वर्षांचा होता. त्याने आमच्या धर्मानुसार कसे पाप केले? जर माझ्या भावाने काही चुकीचे केले असेल तर मी अल्लाहला प्रार्थना करेल की, त्यांनी त्याला माफ करावे. पण लोक सोशल मीडियावर त्याच्याविषयी काहीही बोलत आहे. ते फक्त त्याच्या फेममुळे जलेस होत आहेत. मला आठवते दानिश मला म्हणायचा की, 'भाई माझ्यासोबत काय काय होते हे तुला माहिती नाही.' पण याचा अर्थ काय होता हे मला आज कळतंय. यू-ट्यूबवर एक व्हिडिओ आहे, यामध्ये त्याला काही महिन्यांपुर्वी काही लोकांच्या ग्रुपमध्ये मारले होते."

 

लोकांना दानिशचे सोशल मीडिया अकाउंट हॅक रायचे होते 
- गुफरान म्हणाला की, " काही लोक आहेत, ज्यांना त्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करायचे होते. सध्या त्याचा आयफोन माझ्याकडे आहे, त्यावर शेकडो मेल येत आहेत, फेसबुक, टिकटॅक, यू-ट्यूब आणि ईमेल अॅड्रेसचे पासवर्ड्स बदलण्यात आले आहेत. त्याचे इंस्टाग्राम अकाउंटही डिलीट करण्यात आले आहे. आम्ही सायबर सेलमध्येही तक्रार केली आहे." सोशल मीडियावर दानिशची निंदा करणा-या लोकांना त्याचा भाऊ गुफरानने अपील केली आहे की, त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. गुफरान म्हणाला, "माझा भाऊ निरागस होता. तो आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचा आणि दूस-यांची मदत करायचा."

 

बातम्या आणखी आहेत...