आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी; गरोदर राहिल्याने अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अल्पवयीन मुलीवर बलात्कर केल्याप्रकरणी एका तरुणाला विशेष न्यायाधीश डी. जी. मुरूमकर यांनी १० वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त चार महिने साधा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे. विशाल अनिल नाईक (वय २८, रा. गंजपेठ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत पर्वती टेकडी परिसरात ही घटना घडली. 

 

पीडित मुलगी ही बारावीत शिक्षण घेत असताना तिची ओळख नाईक याच्याशी झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघे पर्वती टेकडी परिसरात सतत भेटायचे. त्या काळात विशालने पीडितेवर बलात्कार केला. त्यामुळे पीडित मुलगी ही ५ महिन्यांची गरोदर राहिली. याबाबत पीडित मुलीने विशाल याला सांगितले असता त्याने भेटण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पीडीत मुलीने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून विशाल विरोधात बलात्कार आणि बाल लैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये डीएनए रिपोर्ट महत्वाचा ठरला. अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील शरीर संबंध ठेवले. त्यामुळे हा गुन्हा गंभीर असून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी रासकर यांनी केली. 

 

त्यानुसार न्यायालयाने विशाल याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनाविली. दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या तत्कालीन उपनिरीक्षक आर. टी. सावंत यांनी या गुन्ह्यांचा तपास करून आरेापीिवरोधात भक्कम पुरावे गोळा केले.