आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • YSR Congress Party Chief Jaganmohan Reddy Take Oath As New Chief Minister Of Andhra Pradesh

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, शपथविधी कार्यक्रमात पोहचले नाहीत चंद्रबाबू नायडू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयवाडा(आंध्र प्रदेश)- वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल नरसिम्हा राव यांनी गोपनियतेची शपथ दिली. तेलंगाना आंध्रापासून वेगळे झाल्यानंतर जगनमोहन आंध्राचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत.  रेड्डी यांनी आज एकट्यानेच शपथ घेतली, त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात आले आहे की, त्यांच्या पक्षांच्या मंत्र्याचे पदभार 7 जूनला ठरू शकते. द्रमुक पक्ष प्रमुख एम.के. स्टालिन आणि तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव या शपथविधी कार्यक्रमात हसभागी झाले होते पण, तेलुगू देसम पार्टी (तेदेपा)चे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.


जगनमोहन यांनी विजयवाडाच्या 46 वर्षे जुन्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये शपथ घेतली. आधी हा कार्यक्रम आयजीएमसी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. सगळी तयारीदेखील झाली होती, पण मुसळधार पाऊसामुळे सर्वकाही उद्धवस्त झाले त्यामुळे हा कार्यक्रम इंदिरा गांधी स्टेडियममध्ये करण्यात आला.


जगनमोहन यांनी विधानसभा निवडणुकीत चंद्रबाबू यांचा दारून पराभन केला
46 वर्षीय जगनमोहन आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे सुपूत्र आहेत. यापूर्वी ते कडपा लोकसभा मतदारसंघातून खासदार राहीले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांचा पराभव केला आहे. सुत्रांकडून कळाले की, जगनमोहन यांनी फोन करून चंद्रबाबू यांनाही आमंत्रण दिले होते, पण नायडू या कार्यक्रमात आले नाहीत.


वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागा जिंकल्या
लोकसभा निवडणुकीच्या वेळी आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकादेखील होत्या. यात जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने तेलुगू देसम पार्टीचा दारून पराभव करत, 175 पैकी 151 जागा जिंकल्या. तर लोकसभान निवडणुकीतही राज्यातील 25 पैकी 22 जागेवर विजय मिळवला. 

बातम्या आणखी आहेत...