आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yugandhara Naik Article About Cricket , Divya Marathi

क्रिकेट ‘जंटलमन्स गेम’ राहिलाय का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट हा खेळ जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जायचा. पण गेल्या काही वर्षांतील घडामोडी पाहिल्या तर सर्वात गलिच्छ राजकारण असलेला खेळ म्हणून याला प्रसिद्धी मिळाली आहे. त्यात दरवर्षी भारतात होणार्‍या आयपीएल स्पर्धेने मोलाची भर घातली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने चालणारे बेटिंग, मॅचफिक्सिंग तसेच चिअर गर्ल्सच्या नावाखाली होत असणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन हे सर्व काही पाहिले की खरेच हा खेळ सभ्य लोकांचा राहिला आहे का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. त्यातच आंतरराष्‍ट्रीय गुन्हेगारांचा यामध्ये वाढत असलेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आणि देशप्रेम, नीतिमत्ता याचा पूर्णपणे विसर पडलेली सुखलोलुप जनता. एका सामन्यासाठी पाण्याचा, विजेचा, होणारा अपरिमित वापर पाहिला की वाटते, जगात मागासलेल्या देशांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर असणारा, सर्वाधिक कुपोषित बालके असणारा हाच तो देश आहे का ? असे असेल तर हा सभ्य लोकांचा खेळ आपण अजून किती वर्षे खेळत राहायचे, याचा विचार कमीत कमी देशप्रेमी नागरिकांनी तरी करावयास हवा.