Politics / मुख्यमंत्रिपदाच्या वादात युवा सेनेची उडी; फिफ्टी-फिफ्टीची करून दिली आठवण

युतीचा निर्णय जाहीर करतानाच दाेन्ही पक्ष समसमान जागा लढवतील, असे जाहीर करण्यात आले हाेते

विशेष प्रतिनिधी

Jun 12,2019 09:28:00 AM IST

मुंबई - ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लाेकसभा निवडणुकीपूर्वीच युतीबाबत जी चर्चा झाली त्यात राज्याचे मुख्यमंत्री पद दाेन्ही पक्षांना अडीच- अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जे नेते या बैठकीला हजर नव्हते त्यांनी स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचे काम करू नये,’ असा इशारा देणारे ट्विट युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून केले आहे. दरम्यान, या ट्विटला उत्तर न देण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते.


युतीचा निर्णय जाहीर करतानाच दाेन्ही पक्ष समसमान जागा लढवतील, असे जाहीर करण्यात आले हाेते. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दोन्ही पक्ष विधानसभेला प्रत्येकी १३५ जागांवर लढतील, असे जाहीरपणे सांगितले हाेते. असे असले तरी मुनगंटीवार यांनी साेमवारी राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री हाेईल, असे ठासून सांगितले हाेते. त्यामुळे शिवसेना व युवासैनिक नाराज झाले. शिवसेनेने मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर काेणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र युवा सेनेेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी त्यांना टि‌्वटद्वारे प्रत्त्युत्तर दिले. भाजपने मात्र या टीकेला प्रत्त्युत्तर न देण्याची भूमिका घेतल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली.

X
COMMENT