आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क: 'बिग बॉस 9'ची स्पर्धक राहिलेली युविका चौधरी सध्या खूपच खुश आहे. ती 'कॉमेडी क्लासेस', 'ये वादा रहा', 'अम्मा' आणि 'कुमकुम भाग्य'सारख्या टीव्ही शोमध्ये व्यग्र आहे. नुकतेच तिने सुपरनॅचरल शो 'लाल इश्क'चे शूटिंग केले. युविका लवकरच काही बॉलीवूड चित्रपटांत नव्या लूकमध्ये दिसणार आहे. या मुलाखतीत तिने आपले काही नवीन प्रोजेक्ट्स आणि भावी पती प्रिन्स नरुलासोबतच्या प्लॅनिंगविषयी चर्चा केली...
'डर सबको लगता है'नंतर तुझी ही दुसरी सुपर नॅचरल मालिका आहे. 'लाल इश्क' करण्याचे कारण काय होते ?
'बिग बॉस'नंतर मी पहिल्यांदाच प्रिन्ससोबत पडद्यावर दिसणार आहे. आमच्या चाहत्यांसाठी हे एका ट्रीटसारखे असेल, कारण ते आम्हाला एकत्र पाहण्यासाठी संदेश पाठवत असतात. त्यामुळे आम्हाला जेव्हा लाल इश्कसाठी विचारणा झाली तर आम्ही लगेच होकार दिला. प्रिन्ससोबत काम करण्यास खूप मजा येते.
ही मालिका सुपरनॅचरल पॉवर संकल्पनेवर आधारित आहे. तुझा यावर विश्वास आहे का ?
खरं तर, माझ्यासाठी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी लोकांकडून याविषयी अनेक कथा ऐकल्या आहेत. त्यांच्यावर विश्वास वाटतो. मात्र, कधी मला असा अनुभव आला नाही. मात्र, जर निर्माता एवढा पैसा खर्च करून ही मालिका बनवत असेल तर यात काही तरी सत्य असेल, असे वाटते. वेळ नसल्यामुळे मी मालिका पाहत नाही, मात्र प्रेक्षक याला खूप एन्जॉय करतात, असे मला वाटते. खरं तर, 'नागिन'देखील या वर्षी मोठ्या पातळीवर लाँच करण्यात आली. जोपर्यंत चॅनलला चांगला टीआरपी मिळेल, तोपर्यंत अशा मालिका बनत राहतील. यात काही वाईट वाटत नाही.
तुझ्या इतर दोन चित्रपटांविषयी काही सांग ?
मी हरियाणाच्या एका सामाजिक कार्यकर्तीवर आधारित चित्रपट करत आहे. या चित्रपटाचा भाग होऊन मी खुश आहे. यात त्या महिलेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. यात माझ्या पतीची भूमिका जिमी शेरगिलने केली आहे. भारतीय महिला पतीची ताकद असतात, यात हेदेखील दाखवण्यात आले आहे. दुसरा काॅमेडी चित्रपट आहे.
तू आणि प्रिन्स यावर्षी लग्न करणार असल्याचे ऐकले?
खरं तर, मी सुरुवातीपासूनच काहीच लपवले नाही. लग्नाचे खूप काम असते. त्याची तयारी सुरू झाली आहे. जागा आणि वेळ ठरल्यानंतर मी सर्वांनाच सांगणार आहे. लग्नाचे छोटे-छोटे विधी पार पाडायला मला आवडते. काही विधीदेखील सुरू झाले आहेत.
महेश मांजरेकर, विद्युत जामवाल आणि प्रतीक बब्बरसोबतचा एक व्हिडिओ तु नुकताच पोस्ट केला, याविषयी काही सांग ?
या चित्रपटाचे नाव 'चंद्रमुखी' आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे. मला जसा हवा होता तसाच हा चित्रपट आहे. यात माझी भूमिका खूपच मजेदार आहे. यात माझा नवा लूक पाहून प्रेक्षक चकित होतील. ही भूमिका करण्याची मला संधी मिळाली त्यामुळे मी खुश आहे. महेशजी सोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी त्यांची मोठी चाहती आहे.
बॉलीवूड चित्रपटाची ऑफर आल्याचे ऐकले आहे ?
हो, सध्या माझ्याकडे तीन चित्रपट आहेत. दोन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तिसऱ्याचे चित्रीकरण सुरू आहे. हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगले गेले. पुढचे वर्षदेखील माझ्यासाठी चंागले जावो, कारण पुढच्या वर्षी माझे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.