आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Singh Announces Retirement, He Was Man Of The Series In 2011 World Cup

अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, भावूक होऊन म्हणाला- "2011 मधील मॅन ऑफ द सीरीज नेहमी आठवणीत राहील..."

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतला 2011 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडणारा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने 2011 च्या विश्वचषकात 9 सामन्यात 90.50 च्या सरासरीने 362 रन आणि 15 विकेट्स घेतल्या होत्या. त्या विश्वचषकात त्याला "प्लेयर ऑफ द सीरीज" मिळाला होता. 


2011 विश्वचषकादरम्यान युवराज कँसरसारख्या गंभीर आजाराशी लढत होता. पण, त्याने कोणालाच या गोष्टीची माहिती लागू दिली नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्ध क्वार्टर फायनलपूर्वी डॉक्टरांनी त्याला न खेळण्याचा सल्ला दिला होता, पण त्याने खेळून भारताला त्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात त्याने 57 रन बनवले होते.


"विश्वचषक जिंकणे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते"- युवराज
निवृत्तीची घोषणा केल्यानतर तो म्हणाला की, मी लहानपणापासून माझ्या वडिलांच्या आदेशाचे पानल केले आहे आणि देशासाठी खेळणे हे त्यांचे स्वप्न होते, ते मी पूर्ण केले आहे. मला नेहमी सपोर्ट करणाऱ्या माझ्या फॅन्सना मी धन्यवाद देऊ इच्छितो. 2011 विश्वचषक जिंकणे, मॅन ऑफ द सीरीज मिळणे, माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते. या सीरिजनंतर मला कँसर झाला. हे आभाळातून खाली कोसळण्यासारखे होते. त्यावेळी माझे कुटुंब आणि फॅन्स माझ्यासोबत होते.


देशासाठी खेळेल असा विचारही केला नव्हता
पुढे तो म्हणाला, "एक क्रिकेटर म्हणून करिअरची सुरुवात करताना, देशासाठी खेळेल असा विचारही केला नव्हता. लाहोरमध्ये 2004 मध्ये मी पहिले शतक ठोकले होते. टी-20 वर्ल्डमध्ये 6 चेंडूंवर 6 छक्के मारणे नेहमी लक्षात राहील."


"2014 मध्ये टी-20 फायनल माझ्या आयुष्यातील सगळ्यात खराब सामना होता. तेव्हा मला वाटले होते की, माझे क्रिकेट करिअर आता संपले आहे. तेव्हा पहिल्यांदा मनात विचार आला होता की, मी क्रिकेट खेळणे का सुरू केले...?"
 

ऑस्ट्रेलियाविरूद्ध छक्का मारून परत आला होता
पुढे तो म्हणाला, "दिढ वर्षांनतर मी टी-20 मध्ये परत आलो होतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध शेवटच्या ओव्हमध्ये छक्क लगावला होता. 3 वर्षानंतर मी वन-डेमध्ये परत आलो होतो. 2017 मध्ये कटकमध्ये मी 150 रन बनवले होते, जे माझ्या करिअरमधील सगळ्यात मोटा वन-डे स्कोर होता."


कधीच स्वतःवरचा विश्वास गमावला नाही
"मी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवला आहे. जग काय बोलत आहे, त्याने मला फरक पडत नाही. मी सौरव गांगुली कर्णधार असताना माझ्या करिअरची सुरुवात केली होती. सचिन, राहुल, अनिल, श्रीनाथसारख्या लेजंड्स तसेच जहीर, वीरू, गौतम, भज्जी सारख्या मॅच विनर्ससोबत खेळलो.


आपण जो विचार करतो ते नेहमी होतेच असे नाही
निवृत्ती का घेतली या प्रश्नाला उत्तर देताना युवी म्हणाला की, "यश आणि संधी मिळत नव्हती. 2000 मध्ये करिअरची सुरुवात केली आणि आता 19 वर्षे झाले आहेत. करिअर कधी संपवावे याच गोंधळात मी होतो. मागील टी-20 जो जिंकला होता, तेव्हा निवृत्ती घेण्याचा विचार केला होता, पण आपण जो विचार करतो तसेच नेहमी होत नसते."