आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामातून फिटनेस मेंटेन ठेवतो युवराज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटर युवराज सिंहने आजारातून बाहेर पडल्यानंतर व्यायामाकडे लक्ष दिले. फिटनेससाठी तो ग्लूटेन फ्री आणि प्रोटीनयुक्त आहार घेतो. तो नियमित व्यायाम करतो.

  • आहारात केले बदल

युवराजला भाकर आणि भात दोन्ही आवडतात. मात्र कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराशी लढण्यासाठी त्याने हे दोन्ही पदार्थ खाणे सोडले. तो पांढऱ्या तांदळाएवेजी ब्राऊन तांदूळ खातो आणि ग्लुटेन फ्री पीठाच्या पोळ्या खातो.

  • प्रोटीन गरजेचे

शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य व्यायामा बरोबरच पौष्टिक आहारदेखील घ्यावा असे तो मानतो. त्याच्या मते, स्नायू बळकट करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात, शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आहारात चांगल्या कार्बोहायड्रेटचा समावेश असावा, असे तो मानतो.

  • धावणे

धावणे त्याचा आवडता व्यायाम आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. प्रशिक्षणात तो नेहमी धावण्याला प्राधान्य देतो. धावण्यामुळे शरीर शेपमध्ये राहते. पसरत नाही. शिवाय वजन नियंत्रणात राहते. ताण येत नाही. धावण्याचा त्रास होत असेल तर ३० मिनिटे वेगाने चालावे.

बातम्या आणखी आहेत...