Home | Sports | From The Field | yuvraj singh says he play for only country

युवराज म्हणतो, देशासाठी खेळतो कोणत्या कर्णधारासाठी नाही

Agency | Update - May 31, 2011, 04:15 PM IST

युवराजने आपण देशासाठी खेळत असून, कोणत्या कर्णधारासाठी खेळत नसल्याचे म्हटले आहे.

  • yuvraj singh says he play for only country

    yuvrajsingh_258भारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग याने सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार नसल्याने वेस्टइंडीज दौऱ्यातून नाव मागे घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. युवराजने आपण देशासाठी खेळत असून, कोणत्या कर्णधारासाठी खेळत नसल्याचे म्हटले आहे.

    युवराजने वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपण जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, रैनाची कर्णधारपदी निवड होण्यापूर्वी त्याने न्यूमोनिया झाल्याने आपण या दौऱ्यातून माघार घेत असल्याचे सांगितले. यामुळे युवराज रैनाच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार नसल्याने त्याने माघार घेतल्याचे सांगण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना युवराज म्हणाला, मला न्युमोनिया झाला असून, डॉक्टरांनी १० ते १५ दिवस आराम करण्यास सांगितले आहे. मी यापूर्वी महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली खेळल्याने मला सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळण्यास कोणतीच हरकत नाही.Trending