आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yuvraj Singh Throws Retirement Party, Many Bollywood Celebrities And Ambani Family's Attendance The Party Too

युवराज सिंहच्या रिटायरमेंट पार्टीमध्ये सामील झाले अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी, अंबानी कुटुंबीयांचीही हजेरी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : काही दिवसांपूर्वी युवराज सिंहने अंतरराष्ट्रीय क्रिक्रेटमधून संन्यास घेतला आहे. याची माहिती त्याने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिली होती. आता या घोषणेनंतर युवराजने त्याच्या वेल विशर्ससाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल कीच यांचा लुक खूपच छान होता. पार्टीमध्ये अंबानी कुटुंबासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजची देखील उपस्थिती होती. तसेच युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मादेखील या पार्टीमध्ये सामील झाली होती. पार्टीमध्ये नीट अंबानी,आकाश अंबानी,श्लोक मेहता, रविना टंडन, अनिल थडानी, शिखर धवन, जहीर खान, फरहान अख्तर, शिवानी दांडेकर, विनोद चोप्रा अनुपम चोप्रा, सानिया मिर्झा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती.