आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2019; अर्धशतकाने सुरूवात करणाऱ्या युवराजने आपल्या रिटायरमेंटवर केले हे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील काही वर्षांपासून युवराज सिंगचे क्रिकेट भविष्य चर्चेचा विषय बनला आहे, पण त्याने स्पष्ट केलंय की, वेळ आल्यावर तो या खेळातून निवृत्ती घेईल. युवराज सिंगचा इंडियन प्रीमिअर लीग(आयपीएल) रेकॉर्ड चांगला नाहीये, पण रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध मॅच खेळताना त्याने मुंबई इंडियन्स टीमकडून अर्धशतक जडून ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे.


दिल्ली कॅपिटल्ससोबतचा मॅच मुंबईने हरल्यानंतर युवराजने वक्तव्य केले, तो म्हणाला, ‘जेव्ह योग्य वेळ येईल, तेव्हा मी संन्यास घेईल.’ पण, 2007 टी-20 आणि 2011 वनडे वर्ल्ड कपचा हीरो राहिलेल्या युवराजने हेदेखील मान्य केले की, त्याच्याकडून सध्या चांगल्या प्रकारची कामगिरी होत नाहीये.


मागच्या दोन वर्षात खूप चढ उतार पाहिले 
पुढे तो म्हणाला, 'मागचे दोन वर्षात माझ्या आयुष्यात खूप चढ उतार आले होते, त्यामुळे मी माझ्या करिअरबद्दल काहीच विचार करू शकलो नाही . मी आत्मपरिक्षण केले आणि त्यातून असे जाणवले की, मला अंडर-16 मध्ये खेळत असताना जो आनंद मिळत होता, तोच आनंद आताही मिळत आहे. मला त्यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड होईल का नाही, याबद्दल काही वाटत नव्हते आणि आताही तोच विचोर मनात येत आहे. मी माझ्या परिने जितंक होईळ तितक खेळत राहणार आहे.'


सचिनसोबत बोलत राहणे युवराजसाठी फायद्याचे
तो म्हणाला, 'माझ्या करिअरबद्दल मी सचिनसोबतदेखील चर्चा केली आहे.' सचिनने युवराजला त्याच्या करिअरच्या शेवटच्या दिवसांत काय वाटायचे ते सांगितले. युवराज म्हणाला, ‘मी सचिनसोबत नेहमी बोलत असतो. तो मला सगळ काही सांगतो, 37-38-39 या वयात त्याला कसं वाटायचं हेदेखील त्याने सांगितल. त्याच्याशी बोलून सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या आहेत. माझे क्रिकेटवर खूप प्रेम आहे, त्यामुळेच मी अजूनही खेळत आहे आणि जोपर्यंत शक्य असेल मी खेळत राहील.

बातम्या आणखी आहेत...