दंगल गर्ल जायरा वसीमने काश्मीरमधील परिस्थितीवर केले भाष्य, म्हणाली - आमचे आयुष्य नियंत्रित केले जात आहे
एका वर्षापूर्वी
कॉपी लिंक
जायराने सोशल मीडियावर पोस्ट करून व्यक्त केले मत
काश्मिरमधील परिस्थितीवर उपस्थित केले अनेक प्रश्नचिन्ह
बॉलिवूड डेस्क - धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी बॉलिवूडला रामराम ठोकणारी जायरा वसीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने काश्मिरमधील परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, "काश्मीरमध्ये सतत अडचणी वाढत असून आशा आणि उन्मानाद फसला आहे. सतत भेदभाव वाढणाऱ्या या ठिकाणी शांततेचे खोटे प्रदर्शन केले आहे. काश्मिरी अशा जगामध्ये जगत आहेत जेथे त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध अगदी सोपे आहे."
तिने पुढे लिहिले की, "आपल्याला अशा जगात जगायाचे का जिथे आपल्या इच्छांवर आणि जीवनावर नियंत्रण ठेवले जात आहे आणि झुकणे शिकवले जात आहे? आमच्या आवाजाला दाबणे इतके सोपे का आहे? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणे इतके सोपे का आहे? आम्हाला कधीच बोलण्याचे स्वातंत्र्य का मिळाले नाही? आमचे मतभेत आणि निर्णयांना आमच्या इच्छेविरुद्ध का ठेवले जात आहे?" असे अनेक प्रश्न तिने विचारले आहेत.