आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2010 मध्ये आलेल्या सलमान खान स्टारर 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल होत आहे. अलीकडेच ती मुंबईतील एका जिमच्या बाहेर स्पॉट झाली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री जिम आउटफिटमध्ये दिसतेय. पण हा व्हिडिओ समोर येताच ती फॅट शेमिंगला बळी पडली.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
या व्हिडिओमध्ये झरीन वांद्रे येथील एका जिमच्या बाहेर दिसत आहे. तिने ब्लॅक टी-शर्टसह प्रिंटेड पॅन्ट घातली आहे. या स्पोर्टी लूकसह तिने बॅग आणि स्पोर्ट्स शूज कॅरी केले आहेत. यावेळी झरीन हसत पापाराझींना भेटली आणि त्यांना पोज देखील दिली.
आता सोशल मीडियावर व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी झरीनची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'तुला खरंच जिमची खूप गरज आहे'. आणखी एकाने लिहिले, 'ही तर बन पावसारखी दिसतेय.' तर एकाने लिहिले, 'सुंदर अभिनेत्री पण अभिनय कौशल्य शून्य'.
यापूर्वीही झाली ट्रोल
वाढलेल्या वजनामुळे ट्रोल होण्याची झरीनची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही झरीनला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. मात्र, ती तिच्या फिटनेसवर सतत काम करत असते.
कतरिना कैफची व्हायची तुलना
झरीन खानला चित्रपटसृष्टीत पदार्पण करुन 13 वर्षे झाली आहेत. सलमान खानसोबतचा तिचा 'वीर' हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण तिच्या सौंदर्यामुळे लोक तिची तुलना कतरिना कैफसोबत करतात.
झरीन कतरिना कैफसारखी दिसते, असे लोक म्हणतात. झरीन आता चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.