आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेस्बियन भूमिकेसाठी जरीनने वाढवले वजन, म्हणाली - 'पात्र योग्य दिसण्यासाठी बंद केले जिम, वजन वाढवणारे पदार्थ खाल्ले'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जरीन खान लवकरच रोमांस ड्रामा ‘हम भी अकेेले तुम भी अकेले‘मध्ये दिसणार आहे. यात ती एका लेस्बियनची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी तिने एक-दाेन नव्हे तर 5  ते 6 किलो वजन वाढवले आहे.


याबाबत जरीन सांगते...‘मी माझे पात्र मानसीच्या तयारीसाठी दिग्दर्शकांसोबत खूप बोलले त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन पडद्यावर दाखवू शकेल. या चित्रपटासाठी मी वजनही वाढवले आहे. माझे जे पात्र आहे तिला खायला खूप आवडते. जाड दिसण्यासाठी मी आपला व्यायामही बंद केला आहे. ’

जरीन पुढे म्हणाली..‘मी जवळपास तीन महिन्यांपासून जिमलाच गेले नाही. भूमिकेसाठी वजन वाढवणे काही कठीण काम नव्हते. ते तर पटकन वाढते. तरीदेखील वजन वाढल्यामुळे मी खूप वाईट दिसेल इतके वजन वाढू नये याकडेही लक्ष दिले. भूमिकेसाठी वजन वाढवायचे म्हणून खूप जासत खाल्ले नाही. चित्रीकरणासाठी आम्ही धर्मशाळेत थांबलो होतो तेथे पराठेही खाल्ले. डाएट करताना जे पदार्थ खाता येत नव्हते तेदेखील मी खाल्ले. मी तेवढेच वजन वाढवले जे पडद्यावर चांगले दिसेल आणि नंतर वजन कमी करण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत. मी जर व्यायाम केला नाही तर मला अस्वस्थ वाटते. मी आनंदी राहू शकत नाही.

झीरो साइजच्या अभिनेत्रींना घेतात चित्रपटात


सध्या बॉलिवूडमध्ये झीरो साइजची क्रेझ कमी झाली असे मला वाटते. परंतु काही दिग्दर्शकांना झीरो साइजच्याच मुली चित्रपटात हव्या असतात. ते त्यांच्या अभिनयाकडे लक्ष देत नाही तर फक्त अभिनेत्री किती बारीक आहे हेच पाहतात. त्या चांगला अभिनय करु शकतात की, नाही याकडे ते दुर्लक्ष करतात. मी कुणाचेही नाव घेणार नाही. असे बरेच दिगदर्शक-निर्माता आहेत जे अभिनेत्री बारीक आहे का हे पाहूनच तिला चित्रपटात घेतात. माझ्याबााबत सांगायचे झाले तर मी कोणत्याही भूमिकेसाठी वजन कमी करण्याची गरज पडली तर मी नक्की करेन. 

बातम्या आणखी आहेत...