आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी गौरव 2020 नामांकन सोहळ्यात मराठी कलाकारांचा 'सॉल्लिड' स्टाईल फंडा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव 2020 पुरस्काराची नामांकनं नुकतीच एका दिमाखदार सोहोळ्यात जाहीर करण्यात आली.

झी गौरव नॉमिनेशन पार्टीची उत्सुकता प्रत्येक कलाकाराला असते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका दिग्दर्शक आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातील परीक्षक संजय जाधव यांनी केलं. तसेच यंदा नामांकन सोहोळ्याची थिम ‘वायब्रण्ट सॉलिड कलर्स’ अशी होती. 

या थीमला अनुसरून रेड कारपेटवर आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली. 'सॉलिड कलर्सच्या' थीममध्ये कलाकारांनी त्यांच्या सॉल्लिड फॅशन सेन्सने या सोहळ्यातील ग्लॅमर कोशंट वाढवला.  #zeegauravnominationparty #ZeeGaurav2020 #ZeeGaurav #ZeeMarathi #21yearsofZeeGaurav #ZGP A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on Mar 6, 2020 at 8:26am PST या नामांकन सोहळ्यात सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, मकरंद देशपांडे, अपूर्वा नेमळेकर, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अभिज्ञा भावे, अतुल परचुरे, उषा नाडकर्णी आणि मराठी सिने आणि नाट्य सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.