आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स 2018’वर ‘तुला पाहते रे’ची ठसठशीत मोहोर, संगीतकार अशोक पत्की यांना जीवन गौरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘झी मराठी अवॉर्डस’ हा सोहळा नुकताच छोट्या पडद्यावर पार पडला. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळाली आहेत. यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘तुला पाहते रे’ या मालिकेने तब्बल 9 पुरस्कार पटकावत बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘माझ्या नवऱ्याची बायको’मालिकेनेही 5 पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला एक विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

 

अशोक पत्की यांना जीवनगौरव... 
झी मराठीवरील मालिका आणि त्यातील कलाकार जितके लोकप्रिय आहेत तितकीच सर्व मालिकेची शीर्षक गीतं देखील श्रवणीय आहेत. अगदी आभाळमाया ते सध्या चालू असलेल्या मालिकांची शीर्षक गीतं ही प्रेक्षकांच्या ओठांवर अगदी रुळली आहेत. ही शीर्षक गीतं मालिकेची फक्त ओळख राहिली नसून आजच्या युगात ती काहींच्या फोनची रिंगटोन तर काहींच्या म्युजिक गॅलरीमध्ये सेव्ह झाली आहेत. संगीतकार अशोक पत्की यांचं या शीर्षक गीतांमुळे झी मराठीशी एक अतूट नातं निर्माण झालं आहे. या सर्व गीतांच्या सुंदर रचनेमागे अशोक पत्की असून त्यांच्या इतक्या वर्षाच्या या सांगीतिक प्रवासाचं कौतुक नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ मध्ये करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या या सांगीतिक प्रवासात झी मराठी आणि त्यांचं नातं कसं दृढ झालं हे त्यांनी सांगितलं. 

 

‘झी मराठी’वरील मालिकेतील प्रमुख जोड्यांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, कलाकारांची आगळी वेगळी अंताक्षरी, बालकलाकारांची धूम, ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला अभिजीत खांडकेकर आणि संजय मोनेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला.  


ही आहेत झी मराठी अवॉर्ड्स 2018च्या विजेत्यांची नावे

सर्वोत्कृष्ट मालिका - तुला पाहते रे

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम - चला हवा येऊ द्या

सर्वोत्कृष्ट नायिका - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट नायक - विक्रांत सरंजामे (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट जोडी - राणा-अंजली (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) - ईशाचे वडील (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) - बरकत  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (महिला) - रेवती (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट भावंडं - राणा-सुरज  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट सून - अंजली  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट सासू - राधिकाची सासू (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट सासरे - राधिकाचे सासरे (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा - राहुल्या (लगीरं झालं जी)

सर्वोत्कृष्ट आई - ईशाची आई (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट वडील - ईशाचे बाबा (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट कुटुंब - निमकर कुटुंब (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक - संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये)

सर्वोत्कृष्ट खलनायिका - नंदिता (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट खलनायक - हर्षवर्धन (लागीरं झालं जी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार - लाडू  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत - तुला पाहते रे

 

पाहुयात, या सोहळ्याची निवडक क्षणचित्रे...

बातम्या आणखी आहेत...