'झिरो इफेक्ट / 'झिरो इफेक्ट : फिल्म फ्लॉप झाल्यामुळे शाहरुखवर झाला खूप परिणाम, होत नाहिये नवीन प्रोजेक्ट साइन करण्याची हिंम्मत

फॅमिलीसोबत वेळ घालवू इच्छितो शाहरुख...

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 29,2019 05:10:13 PM IST

बॉलिवूड डेस्क : शाहरुख खानचे म्हणणे आहे की, फिल्म 'झिरो' च्या क्रिटिकल आणि कमर्शियल फेलियरचा त्याच्यावरखूप खोलवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन हिम्मत त्याला होता नाहीये. तो म्हणतो की, यावेळी नवी फिल्म साइन करण्यापूर्वी थोडा वेळ घेईन. मागच्यावेळसारखा लवकर म्हणजेच दोन तीन महिन्यात निर्णय घेणार नाही. शाहरुख बीजिंग फिल्म फेस्टिवलमध्ये 'झिरो' च्या स्क्रीनिंगसाठी चीनला पोहोचला होता. येथे त्याने या फिल्मचे अपयश आणि आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगितले.

फॅमिलीसोबत वेळ घालवू इच्छितो शाहरुख...
शाहरुखने चीनमध्ये एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले, "यावेळी मला नाही वाटत की, मी असे कारेन. मला वाटते की, यावेळी मी फिल्म पाहायला, स्क्रिप्ट ऐकायला आणि बुक्स वाचायला वेळ घेईन. माझी मुलेही आपले कॉलेज लाइफ पूर्ण करत आहेत. सुहाना कॉलेजमध्ये आहे, आर्यनचे शिक्षण वर्षभरात पूर्ण होऊन जाईल. मला फॅमिलीसोबत जास्तवेळ घालवायचा आहे."

जूनमध्येही सुरु होणार नाही प्रोजेक्ट...
शाहरुखने पूढे सांगितले, "मी सांगितले होते की, मी जूनमध्ये पुढचा प्रोजेक्ट सुरु करू शकतो. पण असे करू शकणार नाही. मी तेव्हाच नवी फिल्म करेन, जेव्हा माझ्या मनातून आवाज येईल की, मी हे करायला पाहिजे. तेव्हाच मी अभिनय करेन. मी 15-20 स्टोरीज ऐकल्या आहेत आणि त्यांपैकी 2-3 आवडल्याची आहेत. पण अद्याप मी ठरवले नाही की, कोणती फिल्म करायची आहे. कारण जेव्हा मी हे ठरवेन तेव्हा फिल्मवर काम करायला सुरुवात करेन. मी त्यामध्ये पूर्णपणे मग्न होऊन जाईल. " आनंद एल. रायच्या डायरेक्शनमध्ये बनलेली 'झिरो' मागच्यावर्षी 21 डिसेंबरला रिलीज झाली होती आणि बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाली होती.

X
COMMENT