आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत,  सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हानिहाय वाटप करण्यासाठी उद्या (मंगळवार दि.19) नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबईत सोडत(ड्रॉ) काढला जाणार आहे. हा ड्रॉ परिषद सभागृह क्र.४, सातवा मजला मंत्रालय मुंबई येथे काढला जाईल. राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहन कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी  केले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सध्या या ड्रॉ कडेल लक्ष लागले असून, सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या अध्यक्ष आहेत. तर इच्छुक असणाऱ्यांची देखील मोठी रांग असल्याने उद्याच्या ड्रॉ मध्ये काय होणार यावर सगळे गणित ठरणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरलेली असून, आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले जाईल. त्यावरुन मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ड्रॉ साठी जिल्हा परिषद अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...