आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद सत्ताधारी म्हणाले, निधी मंजुरीनंतर 'एनअाेसी'चे पाहू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम करण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र (एनअाेसी) आणि निधीवरुन मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारिप-बमसं आणि विरोधक असलेल्या भाजप सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. निधी मंजूर झाल्यानंतर एनअाेसीबाबत निर्णय घेण्यात येईल, सत्ताधारी सदस्य आणि अध्यक्षा म्हणाल्या. यावर जिल्हा परिषदेने विहित मुदतीत प्रथम स्वउत्पन्नाचा निधी खर्च करुन दाखवावा, असे अाव्हान देत जि.प. विकास करण्यात सक्षम नसल्याचा पलटवार भाजप सदस्यांनी केला. यातच शिवसेना सदस्यांनी उडी घेत जि.प.च्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावर विकासकामासाठीी जि.प.निधी न देणे हे अामच्या हक्कांवर गदा अाणण्यासारखे असल्याची टीका केली. परिणामी मूर्तिजापूर तालुक्यातील या कामांच्या एनअाेसीचा ठराव अधांतरीच राहिला. 


जि.प.च्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर विकास करण्यासाठीी जि.प.कडून एनअाेसी लवकर मिळत नसल्याचा मुद्या यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अनेकदा गाजला अाहे. ११ सप्टेंबर राेजी झालेल्या सभेत भाजप सदस्या माया कावरे यांनी लाखपुरी सर्कलमध्ये लहान पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधून घेण्यासाठी जि.प.च्या एनअाेसीचा मुद्या मांडाला. यावर भारिप-बमंसच्या सदस्या प्रतिभा अवचार व शाेभा शेळके यांनी निधी मंजूर झाला काय, असा सवाल केला. यावरुन विराेधी पक्ष नेते भाजपचे रमण जैन, संताेष वाकाेडे यांनी अाक्रमक पवित्रा घेत विकासासाठी एनअाेसी देण्यास काय हरकत अाहे, असा सवाल केला. निधी मंजूर झाल्यानंतर एनअाेसी देण्यात येईल, असा तरी ठराव घ्यावा, असा अाग्रह भाजप सदस्यांनी धरला. डिपीसीमध्ये अापल्या सदस्यांनी यावर मुद्या उपस्थित करणे अावश्यक असल्याचे मत सदस्य चंद्रशेखार पांडे गुरुजी यांनी मांडले. जि.प.ला निधी द्या; अाम्हीच विकास कामे करु, असे भारिप-बमंस सदस्यांचे म्हणणे हाेते. 


डिपीसीमध्ये अाधी स्वउत्पन्नाच्या खर्चाचे काय, असा सवाल उपस्थित झाल्यास काय कराल, असे कांॅग्रेसचे सदस्य बाळासाहेब पाटील बाेंद्रे म्हणाले. यावर अध्यक्षा संध्या हरिदास वाघाेडे यांनी निधी मंजूर झाल्यानंतर एनअाेसीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. सभेला उपाध्यक्ष जमीर उल्ला खान, शिक्षण सभापती पुंडलीराव अरबट, समाज कल्याण सभापती रेखा अंभारे, महिला व बाल कल्याण सभापती देवकाबाई पाताेंड, सदस्य दमाेदर जगताप, गाेपाल काेल्हे, अधिकारी उपस्थित हाेते. शिवसेनेकडून भाजपची काेंडी करण्याचा प्रत्यक्ष डिपीसीकडून मिळणारा निधी व जि.प.कडून देण्यात येणारे एनअाेसी या मुद्यावर शिवसेनेकडून भाजपची काेंडीचा प्रयत्न झाला. शिवसेना सदस्य, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी डिपीसीने निधी जि.प.ला द्यावा; मात्र असे न करताच एनअाेसी मागणे, काम इतर यंत्रणांनी करणे , हे अामच्या अधिकाऱ्यांवर गदा अाणण्यासारखे अाहे, अशी टिका त्यांनी केली. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने पूल केवळ एकाच ठिकाणी न करता इतरही ठिकाणाच्या पुलासाठी निधी अाणावा, असा टाेला शिवसेनेच्या सदस्या ज्याेत्सना चाेरे यांनी लगावला. 


वेळेवर अालेले १३ विषय मंजूर समाज कल्याण विभागातर्फे अपंग कल्याण निधीमधून १ काेटी १३ लाखाच्या खर्चला मंजुरी दिली. मूर्तिजापूर तालुक्यातील पूलवगळता अनेक ठिकाणच्या रस्त्यांसाठी नाहकरत प्रमाणपत्र देण्याचा ठराव मंजूर केला. २०१६-१७ मध्ये मंजूर रस्त्यांच्या कामात बदल केले. यात नवथळ ते भाेड एेवजी लामकाणी फत्तेपूर देवरी, देऊळगाव ते वडाळी देशमुख एेवजी वडाळी देशमुख ते काळ गव्हाणचा समावेश अाहे. पिवंदळ येथील पाझर तलावाच्या कामाला द्वितीय सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात अाली. मूळ मंजुरी १७ लाखांची हाेती. ती मअाता ८१ लाखांपर्यंत पाेहाेचली अाहे. सांगवी बु. येथील काेल्हापुरी बंधाऱ्याच्या सुधारित अंदाजपत्राला मंजुरी देण्यात अाली. पळसाे व महान येथे प्राथमिक अाराेग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा ठराव मंजूर करण्यात अाला. जनसुविधा व यात्रा स्थळांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात अाली. निधीपेक्षा जादा प्रस्ताव अाल्याने िनवडीचे अधिकारी अध्यक्षांना प्रदान करण्यात यावे, असे अधिकारी म्हणाले. 


पाणी पुरवठा याेजनांचे हाेणार हस्तांतरण

अकाेट व तेल्हारा तालुक्यातील १८१ गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर िज.प.कडे हस्तांतरीत करण्याचा ठराव घेण्यात अाला. या याेजनेअंतर्गत वान प्रकल्पाजवळ जलशुद्धीकरण केंद्र उभारुन तेथूनच पाणी ग्रामस्थांपर्यंत पाेहाेचवण्यात येणार अाहे. अालेगाव-नवेगाव १४ गावे व देऊळगाव १६ गावे या दाेन्ही प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनाही पूर्णत्वास गेल्यानंतर अािण यशस्वी चाचणी झाल्यानंतर हस्तांतरण हाेणार अाहे. 


सभेच्या विषय सूचीवर केवळ तीनच विषय 
सर्वसाधारण सभेच्या विषय सूचीवर केवळ तीनच विषयांचा समावेश हाेते. यात १९ जून राेजी झालेल्या सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, उमरा येथील नवीन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ स्थापन करण्यास मंजुरी देणे, जिल्हा परिषदेच्या सन २०१५-१६मध्ये झालेल्या वार्षिक जमा व खर्चास मंजुरी देणे या विषयांचा समावेश हाेता. हे तीन्ही विषय मंजूर करण्यात अाले. 


हे पाेथी वाचन अाहे काय? 
वेळेवर अालेल्या १३ विषयांचे वाचन करण्यास सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी प्रारंभ केला. यावर शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांनी हे पाेथी वाचन सुरु अाहे काय, असे म्हणत दिलेल्या टिपण्णीनुसार विषय वाचा असे सांगितले. शिवसेनेचे नितीन देशमुख यांनाही वेळेवर १३ विषय कसे मांडण्यात येतात, या विषयांची नाेंद विषयसूचीवर का नसते, असे सवाल उपस्थित केले. सभेला सीईअाे पगारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी खिल्लारे यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...