आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Zomato ने 541 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस'ला ठरवले जबाबदार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने शनिवारी मोठा निर्णय घेत आपल्या 541 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये ग्राहक, व्यापारी आणि डिलेव्हरी सपोर्ट टीमचा समावेश आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस' तंत्रज्ञानाचा समावेश केल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीच्या मते, या तंत्रज्ञानामुळे थेट ऑटोमेशनद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत आहे. 
 

नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना दिले 2 महिन्यांचे अतिरिक्त वेतन 
कंपनीने सांगितले की, 'तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अशाप्रकारचा ह निर्णय घेणे अत्यंत दुखद होते. नोकरीवरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांचे अतिरिक्त वेतन देण्यात आले आहे. सोबतच त्यांच्या कुटुंबीयांना जानेवारी 2020 पर्यंतचा आरोग्य विमा देण्यात आला आहे.' कंपनीच्या मते, तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळ बॅकहेडमधील सहायतेची आवश्यकता भासत नव्हती. यामुळे येथील काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले. 
 

गेल्या महिन्यात 60 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते
कंपनीने सांगितले की, 'आमची तंत्रज्ञान उत्पादने आणि प्लॅटफॉर्म सुधारित झाली असल्याचे आम्ही गेल्या काही महिन्यांत पाहिले. कंपनीने सेवा निराकरणाची गती सुधारली आहे आणि आता आमच्या फक्त 7.5% ऑर्डरना सहायतेची आवश्यक आहे.' कंपनीने गेल्या महिन्यात आपल्या गुडगाव ऑफिसमधील गरजेपेक्षा जास्त 60 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.