आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तर पेढे वाटत फिरू नये; फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. अनेक जिल्हा परिषदांवर शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. या पराभवानंतर भाजपची चिंतन बैठक आज मुंबई पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषदा जरी हातातून गेल्या असल्या तरी सर्वाधिक मतदान भाजपलाच मिळाले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तरी हे पेढे वाटत आहेत. हे पेढे वाटणं त्यांनी बंद करावे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

3 पक्ष एकत्र आल्यानंतर सुद्धा भाजप मोठा पक्ष


फडणवीस म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा आहे. आमच्या 52 जागा होत्या. यावेळी त्यात वाढ होऊन 106 जागा झाल्या आहेत. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात देखील भाजपला हार पत्करावी लागली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हा परिषदेत आमच्या 21 जागा आल्या होत्या. शिवसेनेच्या 8-9 जागा आल्या होत्या. आम्ही एकत्रितपणे सत्तेत आलो होतो. यावेळी आम्ही वेगळे लढलो आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढली. आमच्या जागा 21 वरून 15 वर आल्या आहेत. तर शिवसेनेच्या 7 जागा कमी झाल्या,

... तर मनसेसोबत युती करण्याचा विचार करू - फडणवीसांचा पुनरुच्चार


देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाली. यानंतर भाजप-सेना युती होणार अशा चर्चा होत होत्या. याबाबत विचारणा केली असता मनसेचे विचारसरणी आणि कार्यपद्धती व्यापक नाही. मनसेने कार्यपद्धती बदलली तर आम्ही वेगळा विचार करू असा पुनरुच्चार फडणवीस यांनी यावेळी केला. 

बातम्या आणखी आहेत...