Home | Maharashtra | Vidarva | Akola | ZP employees one day, Gramsevaks are 3 days on strike

झेडपी कर्मचाऱ्यांचा अाज एक दिवस, ग्रामसेवकांचा ३ दिवस संप

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 12:27 PM IST

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी , ७ अाॅगस्ट राेजी एक दिवसाचा संप करणार असून, सा

 • ZP employees one day, Gramsevaks are 3 days on strike

  अकाेला- प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी , ७ अाॅगस्ट राेजी एक दिवसाचा संप करणार असून, साेमवारी सर्व कर्मचारी जि.प.च्या अावारात एकत्र अाले. त्यानंतर विविध कर्मचारी संघटनांनी साेमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांना निवेदन दिले. हे निवेदन जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जि.प. लेखा कर्मचारी संघटनेतर्फे सादर करण्यात अाले.


  गत दाेन वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर ठाेस निर्णय न झाल्याने प्रलंबित अाहेत. यात कर्मचारी कपात धाेरणासह इतरही मागण्या अाहेत. तसेच ग्राम विकास विभागाकडेही दीर्घ काळापासून काही मागण्या प्रलंबित अाहेत. शासनाच्या वेळ काढू धाेरणांमुळे या मागण्यांची पूर्तता हाेत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे अाहे. परिणामी अाता प्रथम लाक्षणिक संप पुकारण्यात येणार असून, नंतर लवकरच पुढील अांदाेलनाची दिशा निश्चित हाेणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे अाहे.


  ग्रामसेवक युनियनचा तीन दिवसांचा संप
  कर्मचाऱ्याच्या संपात ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी सहभागी हाेणार असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने कळवले अाहे. मात्र ग्रामसेवक ७ ते ९ असा तीन दिवस लाक्षणिक संप पुकारणार अाहेत. जुनी पेन्शन योजना सुरू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, रिक्त पदे त्वरित भरा, अनुकंपा वरील नियुक्त्या निकाली काढा, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्या विरोधी परिणामकारक कायदा करा, अंशकालीन महिला परिचरांना किमान वेतन 10 हजार द्या, महानगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ते द्या, केंद्र सरकार प्रमाणे महागाई भत्ता लागू करा, महिलांना दोन वर्षाची संगोपन रजा मंजूर करा, आयकराची मर्यादा वाढवा अादी मागण्यांचा समावेश अाहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष उल्हास मोकळकर, दिनकर देशमुख, डॉ. नंदकिशोर चिपडे, गुलाबराव खोंड, अशोक वानखडे, गणेश सुरडकर, डॉ. जीवन आपोतीकर, डॉ. रवींद्र कराड, फैजल सैय्यद, मंजुळा बांगर, मायावती खरात, उर्मिला कांगटे, विनोद शिंदे, अतुल इंगळे, शेख चांद कुरेशी, राजेश खुमकर, डि. एन. रूद्रकार, विकास नागरे, ललिता पोळ आदी कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा शाखेचे अध्यक्ष रवी काटे यांनीही संपात सहभागी असल्याचे कळवळे अाहे.

  या अाहेत मागण्या
  १) सातवा वेतन लागू करण्यापूर्वी त्रृटी दूर कराव्यात.
  २) वेतन अायाेग लागू हाेण्यापूर्वी गणेश उत्सवाच्या दरम्यान २५ हजार रुपये वेतन अायाेगापाेटी अग्रिम स्वरूपात द्यावे.
  ३) अंशदान पेन्शन याेजना रद्द करुन तत्काळ पूर्ववत याेजना लागू करण्यात यावी.
  ४) ग्राम विकास विभागाने सुधारित अाकृती बंधामध्ये पदे कमी करु नयेत.
  ५) महाराष्ट्र विकास सेवांमधून वर्ग २ ची पदोन्नतीने पदे भरावीत.
  ६) वाहन चालकाची पदे पूर्ववत ठेवण्यात यावीत.
  ७) िज.प.अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे.
  ८) १४ महिन्यांचा महागाई भत्ता तत्काळ देण्यात यावा.


  काही शिक्षकांचा सहभाग
  जि.प. कर्मचारी समन्वय समितीच्या संपात प्राथमिक , पदवीधर ,माध्यमिक, मुख्याध्यापक , व केंद्रप्रमुख सर्वांनी संपात सहभागी व्हावे, असे अावाहन

Trending